Konkan News: कोकण रेल्वेमार्गावर २९० उन्हाळी विशेष फेऱ्या; जाणून घ्या संर्पूण माहीती

Konkan News: कोकण रेल्वेमार्गावर २९० उन्हाळी विशेष फेऱ्या; जाणून घ्या संर्पूण माहीती

चाकरमान्यांना दिलासा; वातानुकूलित गाड्यांचाही समावेश

Khed News: उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाल्यामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्यरेल्वे प्रशासनाने आतापर्यंत उन्हाळी स्पेशलच्या २९० फेऱ्या जाहीर केल्या आहेत.(kokan railway news )

त्यामुळे चाकरमान्यांसह पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. त्यामध्ये १६ वातानुकूलित फेऱ्यांचा समावेश आहे. उन्हाळी स्पेशल गाड्यांबरोबरच एक्स्प्रेस गाड्यांनाही अतिरिक्त डबे जोडण्यात आल्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे.

Konkan News: कोकण रेल्वेमार्गावर २९० उन्हाळी विशेष फेऱ्या; जाणून घ्या संर्पूण माहीती
Kokan Politics: नारायण राणेंनाच का मिळाली रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी? सामंत कुठे पडले कमी? घ्या जाणून

उन्हाळी सुट्टीसाठी बरेचजण कुटुंबासह गावी येण्याचे नियोजन करतात. याशिवाय सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी कोकणातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्या तितकीच असते. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांना प्रचंड गर्दी असते. कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्यरेल्वे यंदाही पुढे सरसावली आहे. यापूर्वी कोकण मार्गावर २५८ फेऱ्या जाहीर केलेल्या असतानाच दोन एलटीटी-थिविम उन्हाळी स्पेशलच्या ३२ फेऱ्याही जाहीर केल्या आहेत.

त्यामुळे जादा गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या २९० वर पोहचली आहे. उन्हाळी सुट्टीसाठी चाकरमान्यांच्या दिमतीला पश्चिम रेल्वेही धावली आहे. उधना-मंगळूर साप्ताहिक स्पेशल ११ एप्रिलपासून कोकण रेल्वेमार्गावर धावत आहे. वसईमार्गे धावणारी स्पेशल २९ जूनपर्यंत धावणार असून, वसई, विरार, बोरिवलीस्थित चाकरमान्यांच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. या स्पेशलच्या २४ फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

Konkan News: कोकण रेल्वेमार्गावर २९० उन्हाळी विशेष फेऱ्या; जाणून घ्या संर्पूण माहीती
Konkan News : दौलतदादाच्या आयुष्याचं चीज झाल्यासारखं वाटलं आणि नकळत डोळे पाणावले!

दर गुरूवारी व परतीच्या प्रवासात दर शनिवारी धावणाऱ्या स्पेशलला प्रवाशांचा आतापासूनच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेल्ली साप्ताहिक एक्स्प्रेसही ११ एप्रिलपासून धावत आहे. २७ जूनपर्यंत २४ फेऱ्या धावणार आहेत. ही गाडी दर गुरूवारी व परतीच्या प्रवासात दर शनिवारी धावणार आहे. या स्पेशलचे ८ एप्रिलपासून आरक्षण खुले होताच आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली आहे. एलटीटी-थिविमच्या ३२ जादा फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

एलटीटी-थिविमची पहिली फेरी १८ एप्रिलपासून धावणार असून, ६ जूनपर्यंत १६ फेऱ्यांचा समावेश आहे. ही गाडी दर गुरूवारी व परतीच्या प्रवासात दर शुक्रवारी धावणार आहे तसेच एलटीटी-थिविमची दुसरी फेरी २० एप्रिलपासून ८ जूनपर्यंत दर शनिवारी तर परतीच्या प्रवासात दर रविवारी धावणार आहे. या स्पेशलचे १३ एप्रिलपासून आरक्षणही खुले झाले आहे.
-----

Konkan News: कोकण रेल्वेमार्गावर २९० उन्हाळी विशेष फेऱ्या; जाणून घ्या संर्पूण माहीती
Konkan News : 'सांबराची किंकाळी ऐकू आली अन् आमची हालचाल कमी झाली'

एर्नाकुलम-ओखा नव्या रूपात

कोकण रेल्वेमार्गावर पोरबंदर- कोचुवेल्ली साप्ताहिक एक्स्प्रेसपाठोपाठ कोकणमार्गे धावणारी लांब पल्ल्याची एर्नाकुलम -ओखा एक्स्प्रेसही ५ एप्रिलपासून नव्या रंगरूपात धावत असल्याने ही एक्स्प्रेसही प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे तसेच कोकण मार्गावर १६ वातानुकूलित डब्यांच्या फेऱ्या धावणार आहेत.
--

Konkan News: कोकण रेल्वेमार्गावर २९० उन्हाळी विशेष फेऱ्या; जाणून घ्या संर्पूण माहीती
Konkan Alphonso Mango : वाशीत एक लाख 32 हजार हापूस आंब्याच्या पेट्या दाखल; डझनला किती आहे दर?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com