Konkan Graduate Election
Konkan Graduate Electionesakal

कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेना-काँग्रेसच्या दाव्याने 'मविआ' पुढे पेच; कोण पाळणार आघाडी धर्म?

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक (Konkan Graduate Election) कार्यक्रम जाहीर झाला.
Summary

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात उमेदवार दिला नव्हता. महायुतीकडून या दोन्ही जागा शिवसेना ठाकरे गटासाठी सोडण्यात आल्या होत्या.

रत्नागिरी : लोकसभेच्या निवडणुकांचा धुरळा बसतो ना बसतो तोवरच कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक (Konkan Graduate Election) कार्यक्रम जाहीर झाला. या मतदारसंघासाठी शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाने महाविकास आघाडीकडून यापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे, परंतु आता काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा सांगितल्याने आघाडीत जागा वाटपाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) धर्म प्रामाणिकपणे पाळणाऱ्या कॉंग्रेसचे (Congress) कोकण पदवीधरसंघाचे समन्वयक, उच्चशिक्षित असलेल्या रमेश कीर यांचे नाव आता चर्चेत आहे. भाजपच्या निरंजन डावखरे यांचा कार्यकाळ संपल्याने विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सलग दोन वेळा निरंजन डावखरे या मतदारसंघातून निवडून आले आहेत.

Konkan Graduate Election
Kolhapur Lok Sabha : निवडणुकीत धैर्यशील माने, संजय मंडलिक, शाहू महाराजांनी किती रुपये केलाय खर्च? जाणून घ्या..

पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून, तर दुसऱ्यांदा भाजपकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. आता तिसऱ्यांदा महायुतीचे उमेदवार म्हणून ते ही निवडणूक लढविणार आहेत. दरम्यान, शिवसेनेने गेल्या निवडणुकीपासून या मतदारसंघात बांधणी सुरू केली होती. भाजपशी फारकत घेऊन ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांनी गेल्या वेळी निवडणूकही लढवली होती. ते चांगली मते मिळविण्यात यशस्वी झाले होते. त्यामुळे या वेळी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

Konkan Graduate Election
PM Narendra Modi : गंगा घाटावरील PM मोदींचे 'हे' फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

रायगडचे शिवसेना सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी मतदार नोंदणीवर भर दिला आहे. मात्र आता या मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवारी मिळावी, अशी मागणी होऊ लागली आहे. रायगडमधून काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. प्रवीण ठाकूर यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. रत्नागिरीतून मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली असल्याने रमेश कीर हे देखील या मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी तशी तयारी सुरू केली आहे. ही बाब लक्षात घेऊन पक्षाने कोकण पदवीधर मतदार संघासाठी पक्ष समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात उमेदवार दिला नव्हता. महायुतीकडून या दोन्ही जागा शिवसेना ठाकरे गटासाठी सोडण्यात आल्या होत्या. या बदल्यात कोकण पदवीधर मतदार संघावरचा दावा शिवसेनेने सोडावा, हा मतदार संघ काँग्रेससाठी सोडण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून केली जाऊ लागली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Konkan Graduate Election
Agrahara Jail : माजी मंत्री रेवण्णांची न्यायालयीन कोठडीतून सुटका; अनेक अटींसह जामीन मंजूर

दोन्ही जिल्ह्यांतून मागणी

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसचे पक्ष समन्वयक असलेले रमेश कीर हे स्वतः बी. ए., एल. एल. बी. आहेत. जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष, कोकण म्हाडा (राज्यमंत्री दर्जा) माजी चेअरन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यामुळे रमेश कीर यांनाच उमेदवारी देण्याची मागणी दोन्ही जिल्ह्यांतील काँग्रेसच्या कार्यकत्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com