Kolhapur Lok Sabha : निवडणुकीत धैर्यशील माने, संजय मंडलिक, शाहू महाराजांनी किती रुपये केलाय खर्च? जाणून घ्या..

संजय मंडलिक यांचा खर्च ६९ लाख ९२ हजार ३२ रुपये इतका झाला आहे.
Kolhapur Hatkanangale Lok Sabha Election
Kolhapur Hatkanangale Lok Sabha Electionesakal
Summary

‘लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये काही उमेदवारांनी एकूण झालेल्या खर्चापैकी काही खर्च अमान्य केला आहे.'

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत (Kolhapur Lok Sabha Elections) उमेदवारांकडून झालेल्या दैनंदिन खर्चाची तिसरी अंतिम तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये निवडणूक खर्च विभाग व उमेदवारांकडून सादर करण्यात आलेल्या खर्चाचा मेळ घालण्यात आला आहे. त्यानुसार हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांचा सर्वाधिक ७५ लाख २६ हजार ९३५ इतका खर्च झाला आहे.

तर, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांचा खर्च ६९ लाख ९२ हजार ३२ रुपये व कॉंग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांचा खर्च ५९ लाख ९८ हजार ९६१ रुपये इतका झाला आहे. या तीनही उमेदवारांनी एकूण खर्चापैकी काही खर्च अमान्य केला आहे.

Kolhapur Hatkanangale Lok Sabha Election
Sangli Lok Sabha : अचानक स्ट्राँगरूमचा अलार्म वाजला अन् प्रशासनाची उडाली धावपळ, मत यंत्राच्या गोदामाला कडेकोट बंदोबस्त

उमेदवारी अर्ज भरल्यापासून म्हणजे १२ एप्रिलपासून उमेदवारांच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. खर्चाची तीन टप्प्यांत पडताळणी पूर्ण झाली. निवडणूक आयोगाकडून नियुक्त विविध पथकांकडून दररोज खर्चाचा आढावा घेण्यात आला. तसेच उमेदवारांकडूनही दैनंदिन खर्च सादर करण्यात आला. दोन्हीकडून सादर झालेल्या खर्चाची तिसरी अंतिम पडताळणी पूर्ण झाली आहे. यामध्ये कोल्हापूर मतदारसंघातील उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा खर्च ५९ लाख ९८ हजार ९६१ इतका झाला आहे. त्यांच्याकडून ७ लाख १२ हजार ८०० इतका खर्च अमान्य केला आहे.

Kolhapur Hatkanangale Lok Sabha Election
PM Narendra Modi : गंगा घाटावरील PM मोदींचे 'हे' फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

संजय मंडलिक यांचा खर्च ६९ लाख ९२ हजार ३२ रुपये इतका झाला आहे. त्यांनीही ३० लाख ८६ हजार ८६ रुपये खर्च अमान्य केला आहे. त्याचबरोबर हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांचा खर्च ७५ लाख २६ हजार ९३५ रुपये इतका झाला आहे. त्यांनी ४८ लाख रुपये इतका खर्च अमान्य केला आहे. शिवसेना (ठाकरे गट) इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांचा खर्च ३५ लाख ९ हजार ६९६ रुपये, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांचा खर्च ४४ लाख ८६ हजार ९३६ रुपये, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी. सी. पाटील यांचा खर्च १४ लाख ८८ हजार ३८५ रुपये खर्च झाला आहे.

‘लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये काही उमेदवारांनी एकूण झालेल्या खर्चापैकी काही खर्च अमान्य केला आहे. याबाबत ३० जूनला निवडणूक खर्च निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या निवडणूक खर्च पडताळणी समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. यामध्ये या खर्चाची पुन्हा पडताळणी होऊन तो अंतिम केला जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने हा खर्च निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे.

-अतुल अकुर्डे, नोडल अधिकारी, निवडणूक खर्च विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com