

कलमाखाली आग लावल्यावरून हाणामारी
परस्परविरोधी गुन्हा; चिंचखरीत आंबा कलम घेतल्याचा राग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ ः तालुक्यातील चिंचखरी येथे आंब्याच्या झाडाखालील पालापाचोळा गोळा करून आग लावून नुकसान केल्याप्रकरणी एका संशयिताविरूद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला आहे. घरासमोरील व परिसरातील झाडाचा पालापाचोळा आंब्याच्या झाडाखाली गोळा करून जाळत असताना कोयती उलटी धरून मानेवर व मांडीवर मारून दुखापत केल्याच्या ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
आत्माराम बाळाराम बोरकर (रा. मधलीवाडी, चिंचखरी, ता. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना काल (ता. ३०) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास चिंचखरी येथील आंबाबागेत घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार संतोष बाबुराव सुर्वे (वय ६३, रा. मधलीवाडी, चिंचखरी, रत्नागिरी) हे आंब्याच्या झाडावर माकडे आलेली आहेत का, याबाबत पाहणी करण्यासाठी गेले होते. त्या वेळी तेथे राहणार संशयित आत्माराम बोरकर यांनी आंब्याच्या झाडाखाली असलेला पालापाचोळा एकत्र करून झाडाखालीच आग लावली. तू असे का केलेस, असे संशयिताला विचारणा केली असता त्याने सुर्वे यांना शिवीगाळ व दमदाटी केली. संजीवनी सदानंद बोरकर यांचे मालकीचे आंब्याचे झाड हे कराराने घेतले, याचा राग धरून आंब्याच्या झाडाखाली पातेरा पेटवला. यामुळे तयार झालेले आंबे होरपळून नुकसान झाले. या प्रकरणी संतोष सुर्वे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आत्माराम बोरकर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी बोरकर यांनी परस्परविरोधी तक्रार दिली आहे. घराच्या समोरील व परिसरातील आजूबाजूच्या झाडाचा पडलेला पालापाचोळा आंब्याच्या झाडाखाली गोळा करून पातेरा जाळत असताना कोयती उलटी धरून मानेवर व मांडीवर मारून दुखापत केली म्हणून संशयित संतोष बाबुराव सुर्वे (रा. चिंचखरी, मधलीवाडी, रत्नागिरी) याच्या विरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.