Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray Eknath Shindeesakal

Raigad News : रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाचे कार्यकर्ते परतीच्या मार्गावर?

अनेक पदाधिकारी ठाकरे गटाच्या संपर्कात

Raigad News : महाविकास आघाडीत अन्याय होत असल्याचा थयथयाट करत एकनाथ शिंदेच्या बंडात सहभागी झालेले रायगड जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकारी शिंदे गटात येण्यास इच्छुक आहेत. काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींचे थेट पडसाद जिल्ह्यातील राजकारणावरही पडले आहेत.

राष्ट्रवादी सत्तेत भागीदार झाल्यानंतर भाजप समर्पित शिंदे गटाचे पदाधिकारी अस्‍वस्‍थ आहेत. अनेकजण ठाकरे गटाच्या संपर्कात असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिल्यास या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा केव्हाही पक्षात पुनर्प्रवेश करून घेऊ, असे सूचक वक्तव्य ठाकरें गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी केले आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Raigad News : नव्या शैक्षणिक धोरणामुळे रायगडमधील ९५० शाळांवर टांगती तलवार

ठाकरे गटाचे जिल्ह्यातील पदाधिकारी दोन दिवसांपासून तालुकानिहाय बैठका घेत आहेत. दरम्यान शिंदे गटाचे पदाधिकारी-कार्यकर्तेही बैठकीत सहभागी होत आहेत. या सर्व पदाधिकाऱ्यांची मानसिकता परत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आहे. जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात पुनर्प्रवेशाची इच्छा बोलून दाखवल्‍याचा दावा सुरेंद्र म्हात्रे यांनी केला आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Raigad News : शेतकरी कामगार पक्ष शरद पवारांच्या पाठीशी; जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक ‘मविआ’तूनच

सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिंदे गटाच्या आमदारांमध्येही कमालीची अस्वस्थता आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी सोडून महाडचे आमदार भरत गोगावले, खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी ही नाराजी व्यक्त केली.

त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मतदारांची सहानुभूती हवी आहे. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्यापूर्वी इच्छुक उमेदवार सुरक्षित राजकीय नेतृत्व शोधत असून शिवसेनेच्या मूळ नेतृत्वाकडे, ठाकरे गटाकडे आकर्षित झाले आहेत.

शिवसेनेचे ७० टक्के कार्यकर्ते शिंदेगटात
शिंदेच्या बंडाला रायगडमधून सुरुवात झाली. एकनाथ शिंदेंबरोबर सर्वप्रथम जाणाऱ्या आमदारांमध्ये रायगडमधील शिवसेनेचे तीनही आमदार गेले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही शिंदे गटात सहभागी झाले होते. हे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षाही जास्त होते. त्‍यामुळे ठाकरे गटात केवळ कट्टर कार्यकर्तेच उरले होते. त्यांनीच पक्षाचा कारभार वर्षभर कोणताही गाजावाजा न करता सुरू ठेवला. आता हेच शांत राहिलेले कार्यकर्ते पुन्हा सक्रिय झाले असून जिल्ह्यात दौरे काढून कार्यकर्त्यांना विश्वासात घेत आहेत.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Shiv Sena News: गाळण येथील भाजयुमो पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत

चार दिवसांपासून आमच्या बैठका सुरू आहेत. दरम्यान शिंदे गटात गेलेले पदाधिकारी, कार्यकर्तेही आम्हाला येऊन भेटले. आगामी स्थानिक निवडणुकांसाठी त्यांना जनतेची सहानुभूती असलेल्या पक्षाची गरज आहे. ठाकरे गटाकडे खंबीर नेतृत्वास जनतेचे प्रेम असल्याने गेलेले कार्यकर्ते पुन्हा ठाकरे गटात येण्यास तयार आहेत. त्यांना अधिकृतपणे पक्षात सामावून घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अनुमती आवश्यक आहे.
- सुरेंद्र म्हात्रे, जिल्हाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, रायगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com