
-अमित गवळे
पाली: गणेश चतुर्थीनिमित्त संपूर्ण रायगड जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. घरगुती व सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू असून, यावर्षीच्या गणेशोत्सवात डिजिटल आमंत्रणाचा नवा ट्रेंड पाहायला मिळतो आहे. पारंपरिक आमंत्रणाच्या पद्धतींपेक्षा डिजिटल बॅनर व व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी आमंत्रण पाठवण्याकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. याबरोबरच नैसर्गिक पूजेच्या साहित्याची मागणी देखील वाढली आहे.