

समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मोरया वॉटर स्पोर्टस् व्यावसायिक व जीवरक्षक यांनी समुद्रात उडी घेऊन या तिन्ही तरुणांना समुद्राच्या पाण्याबाहेर काढले.
esakal
Ganpatipule Beach Drown : गणपतीपुळे येथील समुद्रात मुंबईतील तिघे तरुण बुडाले. त्यापैकी एकाचा बुडून मृत्यू झाला, तर दोघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी (वय २६, रा. मानखुर्द मुंबई) असे मृताचे नाव आहे, तर भीमराज आगाळे (२४, रा. कल्याण, मुंबई) आणि विवेक शेलार (२५, रा. विद्याविहार, मुंबई) या दोघांना वाचविण्यात स्थानिक वॉटर स्पोर्टस् व्यावसायिक, जीवरक्षक, पोलिस व ग्रामस्थ यांना यश आले.