रत्नागिरी : सांघिक कामाने ग्रामीण भागाचा कायापालट

मंत्री उदय सामंत; विक्रांत जाधवांसह बने यांचे कौतुक, पेजे सभागृह राज्यासाठी आदर्शवत
ratnagiri
ratnagirisakal

रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून विक्रांत यांनी नवीन इमारतीसाठी ५८ कोटी ५७ लाखांचा निधी आणण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांनी एक व्हिजन ठेवून काम केले. त्यांच्या मागे निश्‍चितच वडिलाच्या म्हणजेच आमदार भास्कर जाधव यांच्या अनुभव आहेच. याच पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन काम केले, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा कायापालट होऊ शकतो, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.(If all come together and work, the rural areas of the district can be transformed)

ratnagiri
Omicron Updates : महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा स्फोट; भारतात 947 रूग्ण

येथील शामराव पेजे सभागृहाच्या पहिल्या मजल्यावरील नूतन सभागृहाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने आदी उपस्थित होते. मंत्री सामंत म्हणाले, विक्रांत अध्यक्ष म्हणून चांगले काम करत आहेत. जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या फाईली मंत्रालयापर्यंत पोचवण्याची महत्त्वाची कामगिरी करणाऱ्‍या घाणेकर नावाच्या व्यक्तीचाही निधी मिळवून देण्यात मोलाचा वाटा असतो. या निमित्ताचे त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीसाठी पाठपुरावा कुणी केला, यापेक्षा तो रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आला, हे महत्त्वाचे आहे.मंत्री म्हणाले, सिंधुरत्न योजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तो आराखडा बनविताना जिल्हा परिषद अधिकाऱ्‍यांनी जिल्ह्यातील सर्व आमदारांना विश्‍वासात घ्यावे.(Ratnagiri Vidhan Sabha constituency)

ratnagiri
मनालीला फिरायला जायचा प्लॅन आहे? मग, 'या' ठिकाणांना जरुर भेट द्या

शासन आणि प्रशासन एकत्रित काम करत असल्याचे रत्नागिरी जिल्हा परिषदेत पहायला मिळते. त्यामुळे जिल्ह्यातील पोलिसांच्या घराचा प्रश्‍न सुटणार आहे. उपमुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी दौऱ्‍यानंतर निधी मंजुर करण्याचा सपाटा लावला.

अन्य जिल्ह्यातील सदस्य येतात

मंत्री सामंत(Uday Samant ) म्हणाले, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे प्रशासन राज्याच्या तुलनेत वेगळे आहे. येथे राजकीय आखाडा केला जात नाही. हे उभारलेले सभागृह राज्यासाठी आदर्शवत असेच आहे. मिनी विधानसभा म्हणूनच याकडे पाहिले जाऊ शकते. विक्रांत आणि उदय बने यांनी चांगल्या प्रकारे यासाठी मेहनत घेतली आहे. जिल्हा परिषदेत शिस्त कशी पाळली जाते, हे पाहण्यासाठी अन्य जिल्ह्यातील सदस्य येत आहेत.

ratnagiri
गोव्याला जायचा प्लॅन आहे? प्रवाशांसाठी नवे नियम जारी

सभागृहागाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव

नव्याने होणाऱ्‍या वास्तूला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे उपाध्यक्ष उदय बने यांनी जाहीर केले. बाळासाहेबांचे नाव देण्याचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

मंत्र्यांची मिश्कील टिप्पणी

सभागृहात येताना पादत्राणे बाहेर ठेवावीत, अशी विनंत उदय बने यांनी केली होती. मंत्री सामंत यांनीही त्याचे पालन केले. तोच धागा पकडून भाषणामध्ये सामंत म्हणाले, बनेंच्या सूचनेचे मी पालन केले. बने यांच्या संकल्पनेतून आलेले हे सभागृह म्हणजे विकास मंदिर आहे. त्यामध्ये येताना राजकीय जोडे प्रत्येकाने बाहेर ठेवले पाहिजेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com