

Heavy Rains Uproot Tree at Gondale School; No Injuries as School Was Closed
esakal
-सुनील पाटकर
महाड: तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंडाळे येथील गवळवाडीतील शाळेच्या परिसरात मोठे झाड उन्मळून पडले. हे झाड शाळेच्या किचन शेड व संरक्षक भिंतीवर कोसळल्याने दोन्हींचे मोठे नुकसान झाले. शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याने विद्यार्थी वर्गात नसल्याने मोठे संकट टळले.