..अन् पळता भुई थोडी झाली; कोंबड्यांच्या खोलीत शिरले 2 बिबटे

धाडसाने नारकर यांनी दरवाजा बाहेरून लावून घेतल्याने दुसरा खोलीत अडकला.
Two leopards
Two leopardsesakal
Summary

धाडसाने नारकर यांनी दरवाजा बाहेरून लावून घेतल्याने दुसरा खोलीत अडकला.

लांजा : तालुक्यातील कोट येथे पहाटेच्या सुमारास कोंबड्यांच्या खोलीत दोन बिबटे शिरल्याने घबराट उडाली. या दोन बिबट्यांना माणसांची चाहूल लागताच एक जण पळाला; परंतु धाडसाने नारकर यांनी दरवाजा बाहेरून लावून घेतल्याने दुसरा खोलीत अडकला. ही घटना रविवारी पहाटे घडली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश मिळवले.

Two leopards
दापोली : एसटी आगारातील चालक आज चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर

कोट नारकरवाडी येथील चंद्रकांत सोना नारकर यांच्या कोंबडीच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. रविवारी पहाटे दोन बिबटे खोलीमध्ये शिरले होते. त्यामुळे कोंबड्या घाबरून ओरडू लागल्या. त्यामुळे घरात झोपलेले नारकर कुटुंबीय जागे झाले. त्यांनी कोंबड्यांच्या खोलीत पाहिले असता दोन बिबटे शिरलेले दिसले. या बिबट्यांना नारकर कुटुंबीयांची चाहूल लागताच एक बिबट्या पळून गेला; मात्र त्याच वेळी नारकर यांनी धाडस करून कोंबड्यांच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यामुळे दुसरा बिबट्या खोलीत अडकला. त्यानंतर या घटनेची खबर कोट गावचे सरपंच व पोलिसपाटील यांनी लांजा वन अधिकारी व लांजा पोलिसांना दिली. वन कर्मचारी आणि पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनाधिकारी व ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला पिंजऱ्यामध्ये बंद करण्यात यश आले.

या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. हा बिबट्या मादी जातीचा असून दोन वर्षे वयाचा आहे. बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती वनाधिकारी यांनी दिली. बिबट्याची सुटका करण्यात विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड, लांजा वनपाल दिलीप आरेकर, पाली वनपाल गौतम कांबळे, खेड वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक सागर पताडे, विक्रम कुंभार, न्हानू गावडे, मिलिंद डाफळे यांच्यासह लांजा पोलिस ठाणे कर्मचारी, सर्पमित्र अनिकेत मोरे, आतिश कीर यांच्यासह कोट गावातील ग्रामस्थांनी मदत केली.

Two leopards
सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसकडून खड्ड्यात मेणबत्या लावून अनोखे आंदोलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com