esakal | कोकणात अखेर ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले

बोलून बातमी शोधा

uday samant press conference kokan marathi news}

पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी भेट घडवून तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाअंती ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले होते. 

कोकणात अखेर ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : तालुक्‍यातील सातोसेतील त्या रस्त्या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोबत ग्रामस्थांनी आज चर्चा केली. यावेळी त्यांनी पुढील दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत पाहणी करून पुढील निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिले आहे.यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, संघर्ष समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पंडित, उल्हास परब, गुरुदास गवंडे, भिकाजी धुरी, आबा धुरी, शिवदत्त घोगळे, सुभाष करमकर आदी उपस्थित होते.

सातोसे मडुरा रस्ता जर संबंधित कंपनी सुरू होत नाही तर पुन्हा सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी 26 जानेवारीला येथील तहसीलदार कार्यालयासमोर ग्रामस्थांनी उपोषण केले होते. यावेळी संबंधित ग्रामस्थांना आमदार दिपक केसरकर तसेच शिवसेना तालुकाप्रमुख राऊळ यांनी आश्‍वासन देताना या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी भेट घडवून तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाअंती ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले होते. 

हेही वाचा- स्क्रॅप व्यावसायिकाचा खून,  कोगनोळीत टाकला मृतदेह : चक्क आरोपींनी दाखविले ठिकाण

सातोसे ग्रामस्थांसमवेत चर्चा

दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री सामंत यांच्या सोबत  राऊळ यांनी ग्रामस्थांची भेट घालून दिली. यावेळी झालेल्या चर्चेवेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत पाहणी दौरा करून पुढील निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिले. हा रस्ता त्यावेळी संबधित प्रशासनाने संबंधित कंपनीला हॅण्डओव्हर केला होता. त्यामुळे यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असेही पालकमंत्री म्हणाले.

संपादन- अर्चना बनगे