‘ती’ महिला मुंबईत कंटाळून गावी आली अन्....

 woman came to the village from Mumbai
woman came to the village from Mumbai
Updated on

दाभोळ (रत्नागिरी)  : दापोली तालुक्यातील माटवण नवानगर येथील 65 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोमवारी (ता.4) कळताच तालुक्यात खळबळ उडाली. ही महिला, तिचा मुलगा व सून यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.


तालुक्यातील माटवण-नवानगर येथील मुळची ही महिला आपल्या मुलाकडे मुंबई येथे वास्तव्याला होती. तिचे पोटाचे ऑपरेशन मुंबई येथीलच सायन रुग्णालयात झाले होते. यामुळे ती कंटाळली होती, तिने मुलाला गावी घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर तिचा मुलगा व सून तिला रुग्णवाहिकेने घेऊन 30 एप्रिलला रात्री दापोली येथे घेऊन आल्यावर तिला दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करून घेण्यात आले. तिच्या स्वॅबचा नमुना घेऊन तो मिरज येथे पाठविण्यात आला होता. सोमवारी (ता. 4) तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून या महिलेला कोरानाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर शासकीय व आरोग्य यंत्रणा यांची एकच धावपळ उडाली.

मुलगा, सुनेचा स्वॅब तपासणीसाठी मिरजला

या तिघांनाही रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले असून या महिलेचा मुलगा व सुनेचा स्वॅबचा नमुना घेऊन तो मिरज येथे पाठविण्यात आला आहे.  
कोरोनाची लागण झालेल्या या महिलेच्या संपर्कात आलेले तिचे नातेवाईक, ग्रामस्थ व उपजिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी, नर्सेस अशा 35 जणांचे स्वॅबचे नमुने रात्री घेण्यात येणार आहेत. महिलेचे नातेवाईक आणि काही ग्रामस्थांनी तिची भेट घेतल्याचे निष्पन्न झाले असून अशा 16 जणांची यादी तयार करण्यात आली आहे.

माटवणमधील पॉझिटिव्ह

उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्सेस व इतर स्टाफ अशा 19 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. मुंबई येथून रुग्णवाहिका घेऊन आलेला चालक, त्याचा सहकारी व मुंबईत या महिलेला भेटलेले दोन नातेवाईक अशा चार जणांची माहिती मुंबई येथील आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी सांगितले. 
दरम्यान, माटवण नवानगर परिसरात असलेले तांबडी कोंड, कोंथळकोंडकडे जाणार्‍या पायवाटा बंद करण्यात आल्या आहेत. भानघरकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. 

रात्रीत मिळाली 500 कीट

दापोली उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी रात्रीपर्यंत स्वॅबचा नमुना घेण्याचे एकही कीट शिल्लक नव्हते. त्यामुळे कोरोनाबाधीत महिलेचा मुलगा व सून यांचा स्वॅबचा नमुना घेता आला नव्हता. मात्र महिला कोरोनाबाधित झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळताच रात्रीच 500 कीट दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com