
Ratnagiri Police : रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील तरुणीचा तिच्याच प्रियकराने आंबा घाटात खून करून मृतदेह दरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दहा दिवसांपासून बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध घेताना हा खून उघड झाला. याप्रकरणी रात्री उशिरा संशयित दुर्वास दर्शन पाटील (रा. खंडाळा, ता. रत्नागिरी), बार मॅनेजर विश्वास पवार (३५) व मोटार चालक सुशांत नरळकर यांना भक्तीचा खून करून मृतदेह आंबा घाट परिसरात फेकल्याप्रकरणी अटक केली आहे. तपास पोलिस निरीक्षक विवेक पाटील करत आहेत. मृत तरुणीचे नाव भक्ती जितेंद्र मयेकर (वय २२, रा. मिरजोळे) असे आहे.