Chiplun News : पेठमाप-मुरादपूर पुलाचे 13 पिलर पूर्ण; 'या' मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

चिपळूण शहरातील पेठमाप आणि मुरादपूर ही दोन मोठी गावे वाशिष्ठी नदीमुळे विभागलेली आहेत.
Pethmap-Muradpur Bridge
Pethmap-Muradpur Bridgeesakal
Summary

येत्या काही दिवसांत सर्व पिलर मार्गी लागून पुढील कामाला चालना दिली जाणार आहे.

चिपळूण : शहरातील वाहतूक कोडींवर उपाय ठरणारा तसेच शहर वाहतुकीला पर्याय असलेला पेठमाप-मुरादपूर पुलाच्या (Pethmap-Muradpur Bridge) कामाची गती आणखी वाढली आहे. आतापर्यंत १३ पिलरचे काम पूर्ण झाले असून शेवटच्या पिलरचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत सर्व पिलर मार्गी लागून पुढील कामाला चालना दिली जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.

मात्र, ९ कोटींची गरज पडणार आहे. चिपळूण शहरातील पेठमाप आणि मुरादपूर ही दोन मोठी गावे वाशिष्ठी नदीमुळे (Vashishti River) विभागलेली आहेत. इंग्रजांच्या काळात येथे फरशी बांधली होती. ओहोटीच्या वेळी या फरशीवरून वाहतूक केली जात होती. आतादेखील काही प्रमाणात ती फरशी अस्तित्वात असून त्यावरून हलकी वाहने जात असतात; परंतु भरतीच्या वेळी तसेच पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे येथील वाहतूक तसेच येण्या-जाण्याचा मार्ग बंद पडतो.

Pethmap-Muradpur Bridge
मुश्रीफांची राजकीय भूमिका गुलदस्त्यात; महाडिकांच्या नव्या गट्टीने भविष्यातील राजकारण ठरणार अडचणीचे?

त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे येथे पूल व्हावा अशी मागणी नागरिक गेली अनेक वर्षे करत होते. या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी मुरादपूर पेठमाप असा पूल शासनांकडून मंजूर करून घेतला. त्यासाठी सुमारे १२ कोटी शासनाने मंजूर केले असून पुलाच्या कामाला गेल्यावर्षी सुरुवात झाली. पहिल्याच वर्षी ६ पिलरचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर पाऊस कमी होताच पुन्हा कामाला सुरुवात झाली. आतापर्यंत १३ पिलरचे काम पूर्ण होऊन पुढील कामाला गती देण्यात आली आहे. अजून १ पिलरचे काम शिल्लक असून, त्याचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

Pethmap-Muradpur Bridge
'8 एप्रिल 1627 हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी'; ज्येष्ठ इतिहास संशोधकाचं स्पष्ट मत

या पुलासाठी सुरुवातीला १२ कोटी मंजूर झाले असले तरी अजून अधिक निधीची गरज पडणार आहे. त्या अनुषंगाने आमदार शेखर निकम यांनी शासनाकडे ९ कोटींची मागणी केली असून लवकरच हा निधी देखील मंजूर होणार असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली. पुढील वर्षी पुलाचे काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.

Pethmap-Muradpur Bridge
डॉ. आंबेडकरांच्या नावाची कमान पाडल्याप्रकरणी बाजू मांडण्यास सरपंच-सदस्यांना हवीये मुदत; सुनावणीवर आंबेडकरी समाजाचा बहिष्कार

दळणवळण सुलभ होणार

हा पूल सुरू झाल्यास मुरादपूर, पेठमाप, दादर मोहल्ला, बेबल मोहल्ला व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची तसेच शालेय मुलांची गैरसोय दूर होणार आहे. अनेक गावे थेट जोडली जाऊन दळणवळण सुलभ होणार आहे. तसेच शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध होऊन वाहतूक कोंडीची समस्यादेखील निकाली निघणार आहे. त्यामुळे चिपळूण शहरासाठी हा अत्यंत महत्त्वा‍वाचा प्रकल्प ठरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com