होम क्वारंटाईनचा शिक्का मारताना डॉक्‍टरच गेले पळून....

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 23 मार्च 2020

ट्रॅव्हलर्स बसमधून आलेल्या प्रवाशांना तपासणी नाक्‍यावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारत असताना त्यातील एका डॉक्‍टरानेच पलायन केले.

इचलकरंजी (कोल्हापूर) : ट्रॅव्हलर्स बसमधून आलेल्या प्रवाशांना तपासणी नाक्‍यावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारत असताना त्यातील एका डॉक्‍टरानेच पलायन केले. संबंधित डॉक्‍टर कोल्हापूरचा असल्याचे समजले असून, त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

 हेही वाचा- मोठी बातमी : महाराष्ट्र - गोवा सीमा केली सील...

कोरोनाचा  संसर्ग रोखण्यासाठी शासन युद्धपातळीवर लढा देत आहे. इचलकरंजीतील पंचगंगा नदी पुलाजवळ विशेष तपासणी नाक्‍यावर नागरिकांची सर्वंकष तपासणी करण्यात येत आहे. यात परराज्यांतून आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर आवश्‍यकतेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

हेही वाचा- बंद म्हणजे बंद : काय राहणार सुरु आणि काय बंद वाचा...

डॉक्‍टरचा शोध सुरूच
दरम्यान, आज सकाळी सात प्रवाशांना घेऊन बंगळूरहून बस आली होती. बसला कोल्हापुरात प्रवेश दिला नाही. त्यामुळे ही बस इचलकरंजीला आली. तपासणी नाक्‍यावर बस थांबवली. यामध्ये कोल्हापूर, इचलकरंजी, हेर्ले, हरोली, कोरोची येथील प्रवाशी होते. त्यांच्या तपासणीसाठी आयजीएम रुग्णालयाचे पथक आले. पथकाने प्रवाशांची माहिती घेऊन हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यास सुरुवात केली. त्यांना घरातच वेगळे राहण्याबरोबरच आवश्‍यक खबरदारी घेण्याची सूचना केली. याचवेळी डॉक्‍टर असलेल्या प्रवाशाने पथकाची नजर चुकवून दुचाकीवरून पळ काढला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर संबंधित डॉक्‍टरचा शोध सुरूच होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The doctor running the home quarantine seal kolhapur marathi news