वय वर्ष ८५ तरीही देवरुखच्या यमुनाबाई आंब्रेचा स्वच्छतेचा असा वसा... 

प्रमोद हर्डीकर
सोमवार, 30 मार्च 2020

आज त्यांचे वय ८५ हुन अधिक आहे तरीही त्यांचे हे काम अविरतपणे सुरु आहे.वृद्घापकाळाने शरीर थकले आणि वाकले तरीही यमुनाबाई आजही घर व परडे यांची स्वच्छता ठेवतात.

साडवली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाला लोकांना प्रेरीत केले असले तरीही गेली अनेक वर्ष देवरुख मधली आळी येथील यमुनाबाई आंब्रे या स्वच्छतेसाठी काम करीत आहेत.आज त्यांचे वय ८५ हुन अधिक आहे तरीही त्यांचे हे काम अविरतपणे सुरु आहे.वृद्घापकाळाने शरीर थकले आणि वाकले तरीही यमुनाबाई आजही घर व परडे यांची स्वच्छता ठेवतात.परिसरही तेव्हढाच चकाचक ठेवतात.सगळी घरातील कामे उरकुन शरीर साथ देत नसले तरी त्या काम करीत आहेत.पहिल्यापासुन श्रमाचे मोल कळल्यामुळे आज उतारवयातही त्यांनी स्वच्छतेचा घेतलेला वसा सोडलेला नाही.

पहाटे लवकर उठुन सडासंमार्जन करण्याची प्रथा आजही त्या जोपासत आहेत.घरातील केरवारा स्वतः करुन सगळ्या वस्तु जागच्या जागी ठेवण्याचा कटाक्ष आजही त्या बाळगुन आहेत.शरीर थकले आहे पाठीचा कणा वाकला आहे तरीही त्या तेव्हढ्याच जिद्दीने काम करीत आहेत.साधा कागदाचा कपटाही इकडे तिकडे पडलेला त्यांना चालत नाही.

Video : चायनामधून आला हा कोरोना, पण तुम्ही त्याला घाबरू नका ना...

घरासमोरील व मागील बाजुस सारखी स्वच्छता करण्यात त्यांचा वेळ जात असतो.झाडु घेवून पालापाचोळा गोळा करणे,कुंपण घालत बसणे,जमिन सारवणे अशा कामात त्या स्वतःला गुंतवुन ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.देवरुख नगरपंचायतीने स्वच्छता अभियान राबवले आहे.नगरपंचायतीने यमुनाबाई आंब्रे यांची स्वच्छतादुत म्हणुन निवड करुन त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे.हीच त्यांच्या कामाची पोचपावती ठरु शकेल.आज ८५ वय असताना त्या आजुबाजुचा परीसर स्वच्छ ठेवण्यासाठी धडपडत असतात हे विशेष आहे.आजुबाजुचे नागरिकही या कामामुळ प्रोत्साहित होत आहेत. कोणत्याही पुरस्कारासाठी,प्रसिद्घीसाठी यमुनाबाई काम करत नसुन स्वच्छता हीच ईश्वरसेवा असे मानून त्या आजही या वयात कार्यरत आहेत हेच विशेष आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Yamunabai Ambre from Devarukh give importance to cleanness