उमटले हसू ; आणि त्या 35 मुलांचा परतीचा मार्ग झाला मोकळा....

youth of hostel returns in a border in the dodaway sindudurg kokan marathi news
youth of hostel returns in a border in the dodaway sindudurg kokan marathi news

सिंधुदुर्ग : गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील युवक युवतींचा परतीचा मार्ग शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे मोकळा झाला आहे .जवळपास ३५ युवक युवती  शनिवारी दोडामार्ग सीमेवर येणार आहेत .फोंडा येथील उपजिल्हाधिकारी केदार नाईक यांनी  त्यांना परत पाठवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले.

.शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी गुरुवारी चर्चा केली होती. .त्यावेळी त्यांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती .दरम्यान , त्या सर्व युवक युवतींना लागणारे जीवनावश्यक साहित्य आज युवासेनेचे उपतालुकाप्रमुख भगवान गवस आणि बबलू पांगम यांनी गोव्यातील मित्रपरिवाराच्या मार्फत घरपोच केले .

आणि त्या मुलांचा परतीचा मार्ग मोकळा झाला .

काम बंद झालेले , घरमालकाने घर सोडून जाण्याचा तगादा लावलेला , संपूर्ण देशात लॉकडाऊन आणि गोव्यात संचारबंदी असल्याने बाहेर पडणे अशक्य होते , घरातील अन्नधान्य संपलेले अशा स्थितीत जगायचे कसे असा प्रश्न त्यांना पडला होता .त्यानंतर पत्रकारांनी ती गोष्ट शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातली .श्री .धुरी यांनी मुलांची अडचण लक्षात घेऊन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी  चर्चा केली ती यशस्वी झाली आणि त्या मुलांचा परतीचा मार्ग मोकळा झाला .

हेही वाचा- रत्नागिरीत किराणा साहित्य मिळणार घरपोच
 सध्या मडकई गोवा येथील ३५ युवक युवतींना सिंधुदुर्गात आणले जाणार आहे .त्यानंतर अन्य मुलांना आणले जाणार आहे . त्या ३५ मध्ये दोडामार्ग , सावंतवाडी , वेंगुर्ले , देवगड आणि कुडाळ तालुक्यातील युवक युवती आहेत .त्यांना जीवनावश्यक साहित्य मिळाल्याबद्दल आणि घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता .त्यांनी तालुकाप्रमुख बाबूराव धुरी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आभार मानले .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com