esakal | रत्नागिरीत 'या' नऊ लेटलतिफांना दाखविली ‘गांधीगिरी...कशी वाचाच..
sakal

बोलून बातमी शोधा

zilla parishad workers punishment in ratnagiri kokan marathi news

पाच दिवसांचा आठवडा झाल्यामुळे सवय नसलेले कर्मचारी लेट होतात की, वेळेत येतात, याची चाचपणी करण्यासाठी सकाळी पावणेदहा वाजता सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या द्वारावर ठाण मांडून..

रत्नागिरीत 'या' नऊ लेटलतिफांना दाखविली ‘गांधीगिरी...कशी वाचाच..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : पाच दिवसांचा आठवडा झाल्यामुळे सवय नसलेले कर्मचारी लेट होतात की, वेळेत येतात, याची चाचपणी करण्यासाठी सकाळी पावणेदहा वाजता सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या द्वारावर ठाण मांडून येतात, पण साडेचारशे कर्मचारी असलेल्या जिल्हा परिषद इमारतीमधील फक्‍त नऊ जणांवरच लेटलतिफचा शिक्‍का बसला. त्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करत अर्चना वाघमळे यांनी अनोखी गांधीगिरी केली; मात्र त्याची चर्चा दिवसभर सुरू होती.

५ दिवसांचा आठवडा अंमलबजावणी
बायोमेट्रिक झाल्यापासून सकाळी वेळेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जिल्हा परिषदेत वाढली आहे. मशीनवर थम केल्यानंतर गुगलवर माहिती भरणाऱ्यांची संख्या अल्प आहे. कर्मचाऱ्यांना सर्वप्रकारच्या सवयी लागाव्यात, यासाठी सामान्य प्रशासन अधिकारी वाघमळे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या महिन्याभरात त्याची कसून तपासणी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने पाच दिवसांच्या आठवड्याची अंमलबजावणी करा, असे आदेश काढले आहेत. त्यानुसार सकाळी ९.४५ वाजता कार्यालय सुरू आणि सायंकाळी ५.४५ ला कामकाज बंद होईल.

हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनां नाणार रिफायनरी प्रकल्प हवा आहे ; भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

शनिवार, रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारपासून (ता. २) त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांकडून याचे तंतोतंत पालन होते की नाही, याची चाचपणी करण्यासाठी सामान्य प्रशासन अधिकारी वाघमळे यांनी सकाळी साडेनऊ वाजताच कार्यालय गाठले होते. सोबत गुलाबपुष्प घेऊन त्या आल्या होत्या.

हेही वाचा- विनायक राऊत समोर आलात तर पायातील चप्पल तोंडात मारू...

सायंकाळच्या वेळेचं काय?
सकाळी वेळेत येण्यासाठी कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवला जातो; परंतु सायंकाळी उशिरापर्यंत काम करावे लागते, त्याचं काय करायचं. अनेकवेळा कामे पूर्ण करण्यासाठी थांबावे लागते. त्याची दखल प्रशासन कोणत्या पद्धतीने घेणार, अशी चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू होती.

हेही वाचा-  बापरे !  या जिल्हात अजूनही चाळीस कोटी रुपये शिल्लकच..

कोणावरही कारवाई केली नाही
जिल्हा परिषद इमारतीत येण्यासाठीच्या दोन्ही दरवाजांवर त्यांनी लक्ष ठेवले होते. एकूण इमारतीमधील नऊ कर्मचारी उशिरा आले. त्या लेटलतिफ कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यांच्या अनोख्या गांधीगिरीने कर्मचारीही अवाक्‌ झाले. वाघमळे यांनी उशिरा येण्याचे कारणही जाणून घेतले. कुणी बारावी परीक्षेला मुलांना सोडण्यासाठी गेल्याचे कारण दिले, तर कुणी आणखी काही. पहिलाच दिवस असल्यामुळे कोणावरही कारवाई केली नाही, मात्र त्यांना समज देण्यात आली.