शिष्यवृतीतून मिळालेली रक्कम गरीब खेळाडूंसाठी, 17 वर्षीय नेमबाज शिवमचे औदार्य

शिष्यवृतीतून मिळालेली रक्कम गरीब खेळाडूंसाठी, 17 वर्षीय नेमबाज शिवमचे औदार्य

मुंबई :  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने सर्वांना अधिक संवेदनशील बनवले आहे. यात लहान- थोर, गरीब-श्रीमंत असा भेदभाव राहिलेला नाही. सोशल मिडियावरून दरोरोज होत असलेले काही व्हिडियो मन हेलावून टाकणारे असतात. एकूणच गंभीर झालेली परिस्थिती आणि प्रामुख्याने गरीब आणि मजुर यांचे होणारे हाल पाहून अनेकांचे हृदय पिळवटून टाकत आहे. 

क्रिकेट सम्राट सचिन तेंडुलकर, विराट कोहली पासून अनेक क्रिकेटपटू तसेच इतर खेळातील खेळाडूंनीही आर्थिक मदत केलेली आहे. मात्र 17 वर्षीय नेमबाज शिवम ठाकूरने तर सर्वांचे मन जिंकले आहे. युवा नेमबाजी स्पर्धांत त्याने यश मिळवलंय. पण कोरोनामुळे ज्या गरीब खेळाडूंसमोर तग धरण्यासाठी धडपड करावी लागत आहे अशा खेळाडूंच्या मदतीला शिवन धावून आला आहे.

शिवम त्याच्याकडे असलेल्या रक्कमेतील 60 टक्ते निधी तो या गरीब खेळाडूंसाठी देणार आहे. ही रक्कम थोडीथोडकी नाही. साधारणतः तीन लाखांची मदत तो करणार आहे. 
शिवमकडे पाच लाख आहेते. बर ही रक्कम त्याने कोठून मिळवलीय तर  शिष्यवृत्तीतून त्याला मिळालेली आहे. त्याच रक्कमेतील तो 60 टक्के निधी खेळाडूंसाठी देणार आहे.

शिवम हा 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात खेळतो. पुढील वर्षी  जुलै महिन्यात दुबईत होणाऱ्या युवा आशिया स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. सध्याची परिस्थिती फारच बिकट आहे, या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिले आणि गरजूंना मदत करण्याकरिताही मदत केली पाहिजे असे भावनिक मत शिवमने व्यक्त केले.

मुळात शिवम काही श्रीमंत कुटुंबातला नाही. तो मध्यमवर्गीय आहे. मुळचा तो बिहारचा वडिलांचे नोएडामध्ये दुकान आहे यातून त्याच्या कुटूंबाचा उदनिर्वाह चालतो. नेमबाज असलेल्या शिवमला क्रिकेटपटू व्हायचे होते. वेगवान गोलंदाज म्हणून तो कारकिर्द घडवतही होता परंतु एक अपघातात त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला आणि त्यानंतर त्याने क्रिकेट सोडून नेमबाजीचा मार्ग स्वीकारला.

17 years shivam donates sixty percent of his earnings for poor sports persons


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com