esakal | सावधान ! कोरोनातुन बरे झाल्यानंतरही आढळून येतायत 'ही लक्षणं, जाणून घ्या महत्वाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

corona patient

कोरोनातून सुखरूप बरं होऊन घरी जाणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. मात्र डॉक्टरांनी अशा रुग्णांच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती दिली आहे.

सावधान ! कोरोनातुन बरे झाल्यानंतरही आढळून येतायत 'ही लक्षणं, जाणून घ्या महत्वाची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसमुळे पसरलेल्या महाभयंकर  महामारीच्या विळखायत अडकलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ८५ हजारांच्यावर पोहोचला आहे. कोरोनातून सुखरूप बरं होऊन घरी जाणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. मात्र डॉक्टरांनी अशा रुग्णांच्या बाबतीत आता एक धक्कादायक माहिती समोर येतेय.  

कोरोनातून जे रुग्ण बरे होतात ते पूर्णपणे बरे होतात आणि त्यांना भविष्यात काहीही त्रास होणार नाही असं नाही. कोरोनातून बरं झाल्यानंतरही दीर्घ काळ मानवी शरीरात बरेच विकार घर करून राहतात अशी धक्कादायक माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अशा रुग्णांना त्यांच्या आरोग्यासंदर्भात बऱ्याच समस्या जाणवत आहेत. तसंच त्यांच्या प्रकृतीवरही कोरोना व्हायरसचा परिणाम होतोय. 

हेही वाचा: सोनाली कुलकर्णी आपल्या वाढदिवशी देणार हे स्पेशल गिफ्ट... 

चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशननं यासंदर्भात काही गाईडलाईन्स ने जारी केल्या आहेत. ज्यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

  • डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आतड्यांचे आजार, मानसिक आजार आणि हृदयाचे आजार अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता आहे.
  • कोरोना बरा झाल्यानंतर हे आजार दीर्घ काळ रुग्णांच्या शरीरात टिकून राहतात ज्यामुळे त्यांची प्रकृती खराब होऊ शकते.
  • या रुग्णांना हार्ट एरिथमिया किंवा एंझाइमाचा सामना करावा लागू शकतो

हेही वाचा: दारूची होम डिलिव्हरी तर सुरु झाली; मात्र ''या'' कारणांमुळे तळीरामांचा होतोय भ्रमनिरास.... 

  • कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना इटिंग डिसऑर्डर, इंसोमेनिया आणि डिप्रेशन येऊ शकतं 
  • मानसिक आणि मेंदूचे आजारही होण्याची शक्यता यामध्ये नमूद केलीये 
  • शरीरासंदर्भातल्या समस्याही उद्भवू शकतात. तसंच कमी वयाच्या रुग्णांमध्ये ताप, लाल डोळे आणि शरीरावर डाग अशा काही समस्या निर्माण होऊ शकतात. 

त्यामुळे जरी तुम्ही कोरोनातून बरे झाले आहात तरी तुम्ही स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय. 

covid-19 patients have long tie symtomps even after survived from corona 

loading image