... म्हणून पुन्हा एकादा रंगली धोनीच्या म्हातारपणाची चर्चा

टीम ई-सकाळ
Saturday, 9 May 2020

रांची : इंग्लंडमध्ये रंगलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानाबाहेर असलेल्या महेंद्रसिंह धोनीचा एक नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रांचीच्या आपल्या फार्माऊसमध्ये चिमकल्या झिवासोबत खेळत असतानाचा व्हिडिओ धोनीने आपल्या इन्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलाय. यापूर्वी धोनीचे लेकीसोबत अनेक व्हिडिओ चर्चेत आले आहेत. मात्र नव्या व्हिडिओत म्हातारपणाची ओळख असलेल्या पिकल्या दाढीत धोनीची धावपळ सुरु असल्याचे पाहायला मिळते.  

नाराज मेधा कुलकर्णींची भावनिक प्रतिक्रिया; स्वत:लाच समजावलं

महेंद्रसिंह धोनीला पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात खेळताना पाहण्यासाठी त्याचे लाखो चाहते उत्सुक आहेत. आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना तो चाहत्यांचे पहिल्यासारखेच मनोरंजन करेल, अशी आस होती. पण कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे या स्पर्धेवर संकट कोसळले आहे. स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्यामुळे धोनीच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर धोनी आगामी टी-20 विश्वचषकासाठी दावेदारी पक्की करेल, असा त्याच्या चाहत्यांना विश्वास होता. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यासंदर्भातील संकेत दिले होते. आयपीएल कमगिरीवरुन धोनी ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात निश्चित करता येईल, असे शास्त्रींनी म्हटले होते. मात्र आता या स्पर्धेवरच सावट आल्याने धोनीच्या कमबॅकची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. 

पोलिसांचा खबरी असल्याचा संशय; मग पत्रकाराला

पिकलेल्या दाढीतील 38 वर्षीय धोनीच्या लूकची चर्चा होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील धोनीच्या दाढीवरुन तो म्हातारा झालाय का? अशी चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. या लूकमध्ये तो भारतीय संघात खेळतानाही दिसला आहे. त्यामुळे लूक काही असो पण धोनी पुन्हा मैदानात खेळताना दिसावा, अशी इच्छा धोनीच्या चाहत्यावर्गाची असेल. धोनीशिवाय यापूर्वी लॉकडाऊनमुळे घरात बंद असलेल्या विराट कोहलीच्या दाढीतील पिकलेल्या केसाचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. इंग्लंडचा माजी अष्टपैलू क्रिकेटर पीटरसन याने कोहलीने दाढीतील केस पिकल्यावरुन कोहलीला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Indian Cricket Team Captain Virat Kohali former captain ms dhoni grey bearded look Video Viral