Australian Open: दोनवेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या हालेपला कॉर्नेटने दिला पराभवाचा धक्का

Alize Cornet knocks out two-time grand slam champion Simona Halep in Australia Open
Alize Cornet knocks out two-time grand slam champion Simona Halep in Australia Openesakal

मेलबर्न: ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) स्पर्धेत महिला एकेरीत आज एक मोठा उलटफेर झाला. जागतिक क्रमवारीत ६१ व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या अॅलिझ कॉर्नेटने (Alize Cornet) १४ व्या सीडेड आणि दोन वेळा ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या सिमोना हालेपला (Simona Halep) पराभवाचा धक्का दिला. कॉर्नेटने हालेपचा ६-४, ३-६, ६-४ असा पराभव केला. हा रंगतदार सामना २ तास २२ मिनिटे चालला. (Alize Cornet knocks out two-time grand slam champion Simona Halep in Australia Open)

Alize Cornet knocks out two-time grand slam champion Simona Halep in Australia Open
Australian Open: सानिया-राजीव राम जोडी पोहचली उपांत्यपूर्व फेरीत

कॉर्नेटने सामन्याच्या सुरूवातीलाच हालेपची सर्व्हिस ब्रेक करत आपल्या आत्मविश्वासाची परिचय करून दिला. त्यानंतर पहिल्याच सेटमध्ये हालेपने देखील झुंजार खेळ करत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. अखेर कॉर्नेटने (Alize Cornet) पहिला सेट ६ - ४ असा जिंकत सामन्यात आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटमध्ये सिमोना हालेपने जोरदार पुनरागमन करत आपला अनुभव कॉर्नेटपेक्षा जास्त असल्याचे दाखवून दिले. पण, याही सेटमध्ये अॅलिझ कॉर्नेटने सिमोना हालेपची (Simona Halep) सर्व्हिस ब्रेक करत तिला चांगलीच टक्कर दिली. मात्र हालेपने दुसरा सेट ६ - ३ असा जिंकत सामन्यात बरोबरी साधली.

Alize Cornet knocks out two-time grand slam champion Simona Halep in Australia Open
Australian Open:तारोने अँडी मरेची दुसऱ्याच फेरीत केली बॅग पॅक

तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये मात्र अॅलिझ कॉर्नेटने (Alize Cornet) चांगलाच जोर लावला. तिने अनुभवी हालेपला चांगलीच झुंज दिली. दोन्ही टेनिसपटूंनी (Tennis Player) आपल्या सर्व्हिस राखत ३ - ३ अशी बरोबरी साधली. मात्र सातव्या गेममध्ये कॉर्नेटने हालेपची सर्व्हिस ब्रेक करत आघाडी घेतली. त्यानंतर कॉर्नेटने आपल्या सगळ्या सर्व्हिस अभेद्य राखत तिसरा सेट ६ - ४ असा जिंकला. या बरोबरच सिमोना हालेपचे (Simona Halep) ऑस्ट्रेलियन ओपनमधील (Australian Open) आव्हानही संपुष्टात आणले. जागतिक क्रमवारीत ६१ व्या स्थानावर असणारी कॉर्नेट आता २७ व्या स्थानावर असणाऱ्या अमेरिकेच्या डॅनले कोलिन्सबरोबर उपांत्यपूर्व फेरीत भिडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com