Eng vs Ind: इंग्लंडविरुद्ध तुफानी खेळीनंतर पांड्याने संपवलं 'या' खेळाडूची कारकीर्द

हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने पहिला टी-20 सामना 50 धावांनी जिंकला
All rounder Hardik Pandya shines as India
All rounder Hardik Pandya shines as Indiasakal

Eng vs Ind T20 Match: हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने पहिला टी-20 सामना 50 धावांनी जिंकला आहे. भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 198 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 19.3 षटकांत 148 धावा करून ऑल आउट झाला. घरच्या मैदानावर इंग्लंडचा हा सर्वात मोठा पराभव आहे.

All rounder Hardik Pandya shines as India
Hardik Pandya : कुंफू पांड्याची अष्टपैलू कामगिरी; सर्वांची बोलती केली बंद!

हार्दिक पांड्या 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपपासून दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर होता. पण अलीकडच्या काळात टीम इंडियासाठी सर्वात मोठा मॅचविनर असल्याचे तो सिद्ध होत आहे. हार्दिक पांड्याचं फॉर्ममध्ये येणे ही टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. हार्दिक पांड्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात फलंदाजी असो की गोलंदाजी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याच्या खेळीनंतर व्यंकटेश अय्यरच टेन्शन वाढले आहे.(All rounder Hardik Pandya shines as India take place venkatesh iyer)

All rounder Hardik Pandya shines as India
ENG v IND : पहिल्या सामन्यात भारताचा 50 धावांनी विजय; मालिकेत 1-0 ची आघाडी

सलामीला फलंदाजी करणारा व्यंकटेश अय्यर त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. परंतु तो गेल्या काही काळापासून अत्यंत खराब फॉर्मशी झुंज देत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंतने एका सामन्यात व्यंकटेश अय्यरला संधी दिली नाही. त्याच वेळी, तो आयर्लंड मालिकेत प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकला नाही. व्यंकटेश अय्यरने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात पदार्पण केले आहे. त्याने भारतीय संघासाठी 9 टी-20 सामन्यात 133 धावा केल्या तर 5 बळी घेतले आहेत.

हार्दिक पांड्याने इंग्लंडविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली. त्याने 33 चेंडूत 51 धावांची खेळी खेळली आणि 4 षटकात 33 धावा देत 4 बळीही घेतले. या सामन्यात टीम इंडियासाठी त्याने सर्वाधिक धावा करणारा सर्वाधिक विकेट्सही घेतल्या आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com