Chennai Super Kings Captain : राज तिलक की करो तैयारी... अंबाती रायुडूनं ऋतुराजबाबत केलं मोठ वक्तव्य

Ruturaj Gaikwad CSK Captain
Ruturaj Gaikwad CSK Captainesakal

Ruturaj Gaikwad CSK Captain : भारताचा आणि चेन्नईचा माजी फलंदाज अंबाती रायुडूने नुकतेच आपली निवृत्ती जाहीर केली. चेन्नईने आयपीएलच्या 16 व्या हंगामात गुजरात टायटन्सचा पराभव करत धोनीच्या नेतृत्वात आपले पाचवे विजेतेपद पटकावले. अंबाती रायुडूचा हा शेवटचा सामना होता. तसेच या सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा वारसदार कोण होणार याची चर्चा सुरू झाली.

या चर्चेत अनेक मोठी मोठी नावे समोर येत आहेत. मात्र यामध्ये एका मराठमोळ्या युवा क्रिकेटपटूचं नाव देखील सातत्याने समोर येत आहे. आता या नावावर संघातील एक वरिष्ठ खेळाडू राहिलेल्या अंबाती रायुडूने शिक्कामोर्तब केले. ते नाव म्हणजे ऋतुराज गायकवाड! (Chennai Super Kings Future Captain)

Ruturaj Gaikwad CSK Captain
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी १८ कुस्तीपटूंची निवड

अंबाती रायुडूच्या मते ऋतुराज गायकवाडकडे चेन्नई सुपर किंग्जचे दीर्घकाळ नेतृत्व करण्याची क्षमता आहे. मात्र रायुडूने हे देखील मान्य केले की ऋतुराजला धोनीने आपल्या देखरेखीखालीच तयार करावे लागणार आहे. (Ruturaj Gaikwad Captain)

अंबाती रायुडूने बिहाईंडवूड्स टीव्हीशी बोलताना म्हणाला की, भविष्याचा विचार केला तर ऋतुराजकडे चांगली संधी आहे. त्याच्याकडे संघाचे नेतृत्व करण्याचे सर्व गुण आहेत. जर धोनी भाई त्याला एक दोन वर्षात तयार केले तर तो 7 ते 8 वर्षे संघाचे नेतृत्व करू शकतो. तो सध्या धोनी आणि स्टिफन फ्लेमिंगच्या देखरेखीखाली आहे. ऋतुराज शांत, व्यावहारिक आणि गुणवंत आहे.

Ruturaj Gaikwad CSK Captain
Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरचं नाव गोवा रणजी संघात नाही; 28 खेळाडूंची यादी जाहीर मात्र...

महेंद्रसिंह धोनी आता 42 वर्षाचा झाला आहे. मात्र तरी देखील तो चांगली कॅप्टन्सी करत आहे. आयपीएल 2023 मध्ये दमदार कॅप्टन्सी करून त्याने आपल्या संघाला पाचव्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावून दिले. धोनीचा आयपीएलमधील हा शेवटाचा काळ सुरू आहे. त्याने अजून निवृत्तीची घोषणा केलेली नाही.

दुसरीकडे ऋतुराज गायकवाड हा चेन्नई सुपर किंग्जचा महत्वाचा खेळाडू झाला आहे. त्याने आयपीएलच्या 16 व्या हंगामात अनेक सामन्यात दमदार फलंदाजी करत आपली योग्यता पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com