अमित शहांचे सौरभ गांगुलीच्या घरी 'डिनर पॉलिटिक्स' | Amit Shah met Sourav Ganguly | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah met Sourav Ganguly

अमित शहांचे सौरभ गांगुलीच्या घरी 'डिनर पॉलिटिक्स'

कोलकाता : गेल्या काही दिवसांपासून भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly) राजकारणात येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शहा (Amit Shah) यांनी सौरभ गांगुलीच्या कोलकात्यातील घरी भेट घेऊन या चर्चांना अजूनच हवा दिली आहे.

हेही वाचा: MI vs GT : 'रोहित, पोलार्ड, बुमराहला आता विश्रांती द्या'

गेल्या काही दिवसांपासून सौरभ गांगुली आपली राजकीय इनिंग सुरु करणार अशा बातम्या येत होत्या. त्यावेळी अमित शहा गांगुलीला भेटणार असल्याची चर्चा देखील होती. अखेर आज अमित शहा यांनी सौरभ गांगुलीची त्याच्या कोलकात्यातील घरी भेट घेतली. यावेळी सौरभ गांगुलीचे सर्व कुटुंबीय आणि भाऊ देखील उपस्थित होता. अमित शहा यांनी रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. सौरभ गांगुली हा सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. तसेच अमित शहा यांचा चिरंजीव जय शहा बीसीसीआयचे सचिव आहेत.

हेही वाचा: IPL 2022: आईने गर्भपात केला असता तर हा स्टार जगाला मिळाला नसता

सौरभ गांगुली आणि जय शहा यांचा बीसीसीआय पदाधिकारी म्हणून कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे गांगुली आता राजकारणात उतरणार अशी शक्यता वर्तवली जात होती. सौरभ गांगुलीचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत देखील चांगले संबंध आहे. दरम्यान, सौरभ गांगुलीने अमित शहांबरोबरच्या डिनर पॉलिटिक्सबद्दल बोलताना सांगितले की, 'ते आज संध्याकाळी घरी येणार आहेत. त्यांनी माझे आमंत्रण स्विकारले आहे. आमच्याकडे बोलायला अनेक विषय आहेत. मी त्यांना 2008 पासून ओळखतो. ज्यावेळी मी खेळत होतो त्यावेळी मी त्यांच्याशी भेटायचो. मी त्यांच्या मुलासोबतही काम करत आहे. हे एक जुने नाते आहे.'

Web Title: Amit Shah Met Sourav Ganguly And Had Dinner With Him At His Residence

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top