Anand Mahindra : पायाने तिरंदाजी करणाऱ्या शीतल देवीवर कौशल्यावर आनंद महिंद्रा फिदा! व्हिडिओ शेअर करत म्हणाले कोणतीही कार घेऊन जा..

Sheetal Devi : आनंद महिंद्रा यांनी शीतल देवीने निवडलेली गाडी तिच्यासाठी खास मॉडिफाय करण्याचंही वचन दिलं आहे.
Anand Mahindra Sheetal Devi
Anand Mahindra Sheetal DevieSakal

भारतीय खेळाडूंनी आशियाई पॅरा गेम्समध्ये चमकदार कामगिरी केली आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत पदकांचं शतक पूर्ण केलं आहे. यातील शीतल देवी या खेळाडूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अगदी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे.

शीतल देवी हिने आशियाई पॅरा गेम्समध्ये तिरंदाजी स्पर्धेत दोन गोल्ड मेडल जिंकले आहेत. विशेष म्हणजे ती पायांनी तिरंदाजी करते. आपल्या दिव्यांग असण्याला तिने कधीही आपल्या पॅशनच्या मध्ये येऊ दिलं नाही. तिच्या या संघर्षाला आणि धाडसाला आनंद महिंद्रा यांनी सलाम केला आहे.

"मी माझ्या आयुष्यात आता कधीही छोट्या-मोठ्या समस्यांबाबत तक्रार करणार नाही. शीतल देवी आपल्या सर्वांसाठी एका शिक्षिकेसारखीच आहे." असं आनंद महिंद्रा यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी यासोबत शीतल देवीचा एक प्रेरणादायी व्हिडिओही शेअर केला आहे.

Anand Mahindra Sheetal Devi
Anand Mahindra: या शहरात रस्ते नाहीत तर.. आनंद महिंद्रांनी दाखवली मॉडर्न शहराची झलक, व्हिडिओ व्हायरल

कार गिफ्ट देण्याची ऑफर

आनंद महिंद्रा यांनी शीतल देवीला एक कार गिफ्ट देण्याचीही घोषणा केली आहे. "(शीतल देवी) कृपया आमच्या रेंजमधून कोणत्याही एका कारची स्वतःसाठी निवड करा. तुमच्या सोईनुसार आम्ही ती कार कस्टमाईज करून देऊ." असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आनंद महिंद्रांची ही पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com