IND vs SL: भविष्य टांगणीला! अर्शदीपने कारकिर्दीच्या सुरुवातीलाच केला लाजिरवाणा विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arshdeep singh

IND vs SL: भविष्य टांगणीला! अर्शदीपने कारकिर्दीच्या सुरुवातीलाच केला लाजिरवाणा विक्रम

IND vs SL Arshdeep Singh : भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने श्रीलंकेविरुद्ध अत्यंत खराब गोलंदाजी केली. त्याने सामन्यात 5 नो बॉल फेकले. त्याच्यामुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. खराब गोलंदाजीमुळे अर्शदीप सिंगने एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

हेही वाचा: Prakash Poddar : बीसीसीआयकडे धोनीची शिफारस करणाऱ्या प्रकाश पोद्दारांनी 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगने 2 षटकात 37 धावा दिल्या आणि 5 नो बॉल टाकले. यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने त्याला गोलंदाजी दिली नाही. त्याने 2022 मध्ये भारतासाठी पदार्पण केले आणि त्याची कारकीर्द केवळ 6 महिन्यांची आहे. पण तो टी-20 करिअरमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 22 टी-20 सामन्यांमध्ये 14 नो बॉल टाकले आहेत.

यापूर्वी हा विक्रम तीन गोलंदाजांच्या नावावर होता. यामध्ये पाकिस्तानचा हसन अली, वेस्ट इंडिजचा कीमो पॉल आणि ओशाने थॉमस यांचा समावेश आहे. तिघांनीही 11-11 नो बॉल टाकले आहेत.

हेही वाचा: Abu Dhabi T10 Fixed : रसेल - पोलार्ड अडकणार चौकशीच्या भोवऱ्यात? T10 लीग ICC अँटी करप्शनच्या रडारवर

अर्शदीप सिंगने टी-20 विश्वचषक 2022 मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आणि भारताकडून सर्वाधिक विकेट घेतल्या. मात्र त्यानंतर तो लय गमावू लागला. तो टीम इंडियासाठी आतापर्यंत 3 वनडे खेळला आहे. त्याचबरोबर त्याने 22 टी-20 सामन्यात 33 विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध खराब कामगिरी केल्यानंतर टीम इंडियातील त्याचे स्थान धोक्यात आलेले दिसते. तिसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या त्याच्या जागी मुकेश कुमारला पदार्पणाची संधी देऊ शकतो. मुकेशने देशांतर्गत स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली असून तो उत्कृष्ट लयीत धावत आहे.