Ashes Series : साहेब 'देर आये पर दुरुस्त आए' | Ashes Test Series 5th Test England Bowler good Start | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashes Test Series 5th Test England Bowler good Start
Ashes Series : साहेब 'देर आये पर दुरुस्त आए'

Ashes : साहेब 'देर आये पर दुरुस्त आए'

होबर्ट : अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Test Series) पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना होबर्टमध्ये खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिका ३ - ० अशी आधीच जिंकली आहे. मात्र इंग्लंडसाठी (England Cricket Team) चौथा आणि पाचवा कसोटी सामना हा आपली लाज वाचवण्यासाठी महत्वाचा होता. चौथ्या सामन्यात इंग्लंडला अखेरच्या दिवशी सामना अनिर्णित ठेवण्यात यश आले. याचबरोबर पाचव्या सामन्यातही इंग्लंडने पहिल्या सत्रात चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या (Australia Cricket Team) फलंदाजांना चांगलेच दमवले. इंग्लंडच्या या कामगिरीवरुन साहेब देर आये पर दुरुस्त आए असंच म्हणावं लागेल. (Ashes Test Series 5th Test England Bowler good Start)

हेही वाचा: 'विराटच्या वागण्याचा मुलं काय आदर्श घेतील?'

होबर्टवरील पाचव्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार जो रुटने (Joe Root) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय डेव्हिड वॉर्नरला (David Warner) शून्यावर बाद करत ऑली रॉबिन्सनने (Ollie Robinson) खरा ठरवला. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) चौथ्या सामन्यात लागोपाठ दोन शतके ठोकणाऱ्या उस्मान ख्वाजाला ६ धावांवर बाद करत कांगारुंना अजून एक तगडा झटका दिला. वॉर्नरला बाद करणाऱ्या रॉबिन्सनने स्टीव्ह स्मिथलाही स्थिरावू दिले नाही. त्यालाही भोपळा फुटण्याच्या आतच रॉबिन्सनने चालते केले.

हेही वाचा: सायनला हरवणाऱ्या मालविकाच्या डॉक्टर आईने मुलीसाठी सोडले घर

ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद १२ धावा अशी झाली असताना मार्नस लॅम्बुशग्ने (Marnus Labuschagne) आणि ट्रॅव्हिस हेड (Travis Head) यांनी आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडवर काऊंटर अटॅक केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७१ धावांची आक्रमक भागिदारी रचली. दरम्यान, मार्नस लॅम्बुशग्ने आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. मात्र ब्रॉडने त्याचा ४४ धावांवर त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. पहिल्या सत्राचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंडने ८५ धावात ऑस्ट्रेलियाचा ४ फलंदाज माघारी धाडले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top