नेहराकडून बुमराची पाठराखण, तर झहीरने दिला 'हा' सल्ला!

वृत्तसंस्था
Thursday, 13 February 2020

टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची टी-२० सीरिज ५-० ने जिंकली होती. मात्र, वनडेमध्ये ०-३ने सपाटून मार खाल्ला होता. शुक्रवारपासून (ता.२१) दोन्ही टीममध्ये पहिल्या टेस्टला सुरवात होणार आहे.

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाच्या जसप्रित बुमराला एकही विकेट मिळाली नाही, हा सध्याचा हॉट टॉपिक बनला आहे. त्यामुळे भारताला वनडे सीरिज ३-०ने गमावावी लागली. सोशल मीडियात या विषयी बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू असताना आता टीम इंडियाचे माजी गोलंदाज बुमराच्या पाठीशी उभे राहिले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने प्रत्येक मालिकेत त्याच्याकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे असे म्हणत जसप्रीत बुमराला त्याच्या खराब कामगिरीनंतर पाठीशी घातले आहे. 

तो म्हणाला, ''प्रत्येक मालिकेतच बुमरा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. तो दुखापतीतून पुनरागमन करत आहे हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येक खेळाडूला नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करणे शक्य नसते.''

- क्रिकेट कमेंटेटर म्हणतो 'हिंदी आलीच पाहिजे!'; चाहत्यांमध्ये वाद उफाळला

भारतीय निवड समितीने संघ निवडताना जास्त काळजीपूर्वक संघ निवडायला हवा असेही त्याने सांगितले. तो म्हणाला, ''निवड समितीने संघाची निवड आणखी चांगल्या पद्धतीने करायला हवी. बुमरा आणि महंमद शमी व्यतिरिक्त इतर गोलंदाजांना स्वत:ची जबाबदारी समजायला हवी. गेल्या दोन वर्षांपासून सगळी जबाबदारी बुमरा आणि शमीने घेतली आहे आणि म्हणूनच बुमरा खूप ताण येत आहे.''

- 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनी हाच सर्वोत्तम भारतीय कर्णधार!

झहीरने दिला मोलाचा सल्ला

जसप्रीतवर सध्या खूप प्रेशर आहे. मात्र, त्याने आपली इंटरनॅशनल क्रिकेटमधील इमेज सांभाळली पाहिजे. कारण अपोजिट टीम त्याच्या बॉलिंगवर बचावात्मक पवित्रा अवलंबत आहे. त्यामुळे बुमराने आपला आक्रमकपणा वाढवायला हवा. त्याने नव्या फॉर्म्युल्याच्या शोधात राहून यावर तोडगा काढावा. ज्यामुळे विकेट मिळवणे सोपे होईल. 

- 'जर तू बॉलिंग करशील तर..'; इंग्लंडची डॅनियल चहलला काय म्हणाली पाहा

टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची टी-२० सीरिज ५-० ने जिंकली होती. मात्र, वनडेमध्ये ०-३ने सपाटून मार खाल्ला होता. शुक्रवारपासून (ता.२१) दोन्ही टीममध्ये पहिल्या टेस्टला सुरवात होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सामन्यांत दोन हात करणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashish Nehra and Zaheer Khan defends Jasprit Bumrah after a wicketless ODI series against New Zealand