PAK vs SL Asia Cup Final : पाकिस्तानच्या संघात दोन बदल, जाणून घ्या दोन्ही संघाची Playing-11 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PAK vs SL Asia Cup Final

PAK vs SL Asia Cup Final : पाकिस्तानच्या संघात दोन बदल, जाणून घ्या दोन्ही संघाची Playing-11

Asia Cup 2022 Pakistan vs Sri lanka Final Playing 11 : आशिया कप 2022 चा अंतिम सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणार आहे. श्रीलंकेचा संघ विक्रमी 11व्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. श्रीलंका सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर पाकिस्तानला तिसर्‍यांदा आशिया कपचा चॅम्पियन बनण्याची इच्छा आहे.

हेही वाचा: Aaron Finch Retires: शेवटच्या एकदिवसीय सामन्यात अ‍ॅरोन फिंच बोल्ड; चाहते भावूक - Video

अंतिम सामन्यात पाकिस्तान संघात किमान दोन बदल होणार आहेत. नसीम शाह आणि शाबाद खान श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात खेळले नव्हते. या सामन्यात पाकिस्तान संघाचा पाच विकेट्सनी पराभव झाला होता. या सामन्यात दोन्ही खेळाडू संघात पुनरागमन करणार असल्याची खात्री आहे. या दोघांविरुद्ध श्रीलंकेला सावधपणे फलंदाजी करावी लागणार आहे.

शाबाद आणि नसीमचे पुनरागमन झाल्यास हसन अली आणि उस्मान कादिर यांना संघातून वगळले जाऊ शकते. गेल्या सामन्यात दोन्ही गोलंदाज फार काही करू शकले नाहीत. हसन अलीला एकही विकेट मिळाली नाही, तर कादिरला ब्रेकथ्रू मिळाला. याशिवाय पाकिस्तान संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.

हेही वाचा: Shahid Afridi : IND vs PAK सामन्यात माझ्या मुलीने तिरंगा फडकावला, शाहिद आफ्रिदीचा दावा

श्रीलंकेच्या संघातही दोन बदल होऊ शकतात. फिरकी अष्टपैलू धनंजया डी सिल्वाच्या जागी चमिका करुणारत्ने आणि मदुशनच्या जागी असिथा फर्नांडोला संधी मिळू शकते. श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाला प्रथम गोलंदाजी करण्याची संधी मिळाल्यास तो जुन्या संघासोबत जाऊ शकतो. त्याचबरोबर प्रथम फलंदाजी केल्यास धनंजयाच्या जागी अस्लंका आणि मधुशनच्या जागी अशिताला संधी दिली जाऊ शकते.

श्रीलंका : दासुन शनाका, दनुष्का गुणतिलाका, पाथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, अशिन बंदारा, धनंजया डी सिल्वा, वनिंदू हसरंगा, महेश टीक्षाना, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने , दिलशान पथिराना, दानुका राजपक्षे, नुवानिडू फर्नांडो आणि दिनेश चंडिमल.

पाकिस्तान : बाबर आझम, शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहनवाज डहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन, हसन अली.

Web Title: Asia Cup 2022 Pakistan Vs Sri Lanka Final Playing Xi Dream 11 Prediction Captain Vice Captain Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..