Asia Cup 2023 : बिचारं पाकिस्तान! श्रीलंकेनंतर आता अफगाणिस्तानही पलटले

Asia Cup 2023 Afghanistan Pakistan
Asia Cup 2023 Afghanistan Pakistan esakal

Asia Cup 2023 Afghanistan Pakistan : आशिया कप 2023 च्या आयोजनाचा मुद्दा अजून काही सुटलेला नाही. भारताने पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळण्यास नकार दिल्यानंतर पीसीबीने हायब्रीड मॉडेल सादर केले होते. सुरूवातीला पाकिस्तानमधील काही वृत्तसंस्थांनी या मॉडेलला श्रीलंका आणि अफगाणिस्तानने पाठिंबा दिल्याचे वृत्त दिले होते. मात्र आता हळूहळू श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांनी पाकिस्तानचे हे हायब्रीड मॉडेल मोडीत काढण्यास सुरूवात केली आहे.

Asia Cup 2023 Afghanistan Pakistan
Shubman Gill: काल वेगळ्याच मुलीसोबत डेटची चर्चा अन् आता सारानं शेअर केला गिलचा 'तो' फोटो

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानच्या हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव नाकारला आहे. आता आशिया कप हा त्रयस्थ ठिकाणीच होणार आहे. आशिया कप हा श्रीलंकेत होण्याची शक्याता आहे. बीसीसीआय हे आशिया कप पाकिस्तानमधून दुसरीकडे हलवण्यासाठी आग्रही होते.

पाकिस्तानच्या हायब्रीड मॉडलला सुरूवातीला काही देशांनी पाठिंबा दिला होता. मात्र ज्यावेळी बीसीसीआय सचिव जय शहा जे एशियन क्रिकेट काऊन्सिलचे देखील प्रमुख आहेत त्यांनी पीसीबीचे हे हायब्रीड मॉडेल नाकारले. त्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणारे एका एका देशांनी पलटी मारण्यास सुरूवात केली.

Asia Cup 2023 Afghanistan Pakistan
WTC Final 2023: अजिंक्य रहाणे अन् शार्दुल ठाकूरचे पुनरागमन, 3 खेळाडू संघाबाहेर

हायब्रीड मॉडेलच्या बाजूचे देश विरोधात जाऊ लागल्यानंतर पाकिस्तानने पहिल्यांदा श्रीलंकेतील वनडे मालिका रद्द करण्याची धमकी दिली. मात्र तरी देखील पाकिस्तान एकटा पडत गेला. आता बांगलादेश आणि अफगाणिस्तानने देखील पलटले आहेत.

यापूर्वी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते की पाकिस्तानमध्ये आशिया कप आयोजित करण्याची शक्यता जवळपास नाहीये.

अधिकारी म्हणाला होता की, 'पाकिस्तान आशिया कप आयोजित करण्याची शून्य शक्यता आहे. आम्ही हा विषय आयसीसीकडे देखील नेला आहे जेणेकरून चॅम्पियन्स ट्रॉफी देखील पाकिस्तानमधून हलवली जावी. सध्या तरी श्रीलंका आशिया कप आयोजित करण्याची शक्यता आहे. मात्र याबाबतचा शेवटचा निर्णय हा एशियन क्रिकेट काऊन्सीलच्या बैठकीत घेतला जाईल.'

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com