India Beats Pakistan in Asia Cup 2025 Final
esakal
India Wins 9th Asia Cup Title : आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह भारताने नवव्यांदा आशिया कपच्या ट्रॉफीवरही नाव कोरलं आहे. तसेच एकाच स्पर्धेत पाकिस्तानचा तीन वेळा पराभव करत एक वेगळाच विक्रमही भारतीय संघाने केला. भारताच्या या विजयानंतर आता सर्वत्र खेळाडूंचं अभिनंदन केलं जातंय. पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी या विजयानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भारतीय संघाचं कौतुक केलं.