Asian Games 2023 : भारत - पाकिस्तान एकाच गटात; 'या' तारखेला होणार धमाकेदार सामना

Asian Games 2023
Asian Games 2023esakal

Asian Games 2023 : चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या एशियन गेम्स 2023 मध्ये भारतीय हॉकी संघ आणि पाकिस्तान हॉकी संघ एकाच गटात असणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघाला ग्रुप अ मध्ये ठेवण्यात आले आहे. या ग्रुपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्याव्यतिरिक्त जपान, बांगलादेश, सिंगापूर आणि उझबेकिस्तान या संघांचा देखील ग्रुप अ मध्ये समावेश आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना हा 30 सप्टेंबरला होणार आहे. दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघही ग्रुप अ मध्ये समाविष्ट आहे. या ग्रुपमध्ये कोरिया, मलेशिया, चीन, ओमान, थायलंड आणि इंडोनेशिया या संघाचा समावेश आहे. (India Vs Pakistan)

Asian Games 2023
Sanju Samson R Ashwin : वर्ल्डकपच्या संघात संजूला जागा नाही... अश्विन आपल्याच सहकाऱ्याबद्दल हे काय बोलतोय?

हांगझोऊ एशियन गेम्स आयोजक समिती आणि एशियन हॉकी फेडरशेनने आज संयुक्तरित्या हॉकीचे वेळापत्रक घोषित केले.

याबाबत बोलताना एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या हरमनप्रीत सिंगने सांगितले की, 'आमच्या सोबत ग्रुप अ मध्ये काही तगडे संघ देखील आहेत. यात जपानच्या संघाचा देखील समावेश आहे. त्यांनी 2018 च्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. मात्र आम्ही प्रत्येक संघाला आव्हानात्मक संघच समजणार आहोत. कोणालाही हलक्यात घेणार नाही.'

तो पुढे म्हणाला, 'एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आम्ही यातील बऱ्याच संघांसोबत खेळत आहोत. आम्ही हा अनुभव भविष्यात देखील वापरण्याचा आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करू.'

Asian Games 2023
World Cup 2023 IND Vs PAK : वर्ल्डकपच्या नवीन वेळापत्रकाची होणार घोषणा, तिकीट विक्री कधीपासून होईल सुरू?

एशियन गेम्स 2023 मधील हॉकीचे सर्व सामने हे हांगझोऊ येथील गाँगशू कनाल स्पोर्ट्स पार्क स्टेडियममध्ये होणार आहेत. हॉकीची पुरूष संघाची फायनल ही 6 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. तर महिला हॉकीची फायनल त्याच्या पुढच्याच दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबरला होणार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com