Asian Games 2023 : पुरुष हॉकी संघाचा सलग दुसरा मोठा विजय

१६-० असा धुव्वा उडवल्यानंतर भारताच्या हॉकी संघाने मंगळवारी सिंगापूरवर १६-१ असा दणदणीत विजय साकारला.
krida
kridasakal

हांग्‌ चौऊ - भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्या लढतीत मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सलामीच्या लढतीत उझबेकिस्तानचा १६-० असा धुव्वा उडवल्यानंतर भारताच्या हॉकी संघाने मंगळवारी सिंगापूरवर १६-१ असा दणदणीत विजय साकारला.

हरमनप्रीत सिंग व मनदीप सिंग या दोघांनी हॅट्‌ट्रिक साजरी केली. मनदीप याने १२व्या मिनिटाला, ३०व्या मिनिटाला आणि ५१व्या मिनिटाला गोल करीत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हरमनप्रीतने २४व्या मिनिटाला, ३९व्या मिनिटाला,

krida
Asian Games 2023 : घोडेस्वारीमध्ये ४१ वर्षांनंतर सुवर्ण

४०व्या मिनिटाला आणि ४२व्या मिनिटाला गोल करीत भारताचा मोठा विजय निश्‍चित केला. अभिषेकने ५१व्या व ५२व्या मिनिटाला गोल केले. वरुणकुमारने दोन्ही गोल ५५व्या मिनिटाला केले. तसेच ललित उपाध्यायने १६व्या, गुर्जंत सिंगने २२व्या, विवेक सागर प्रसादने २३व्या, मनप्रीने ३७व्या व शमशेर सिंगने३८व्या मिनिटाला गोल केले.आता लढत जपानशीभारतीय पुरुष हॉकी संघाचा पुढील सामना जपानशी होणार आहे. अ गटामध्ये आतापर्यंत भारत, जपान व पाकिस्तान या देशांनी प्रत्येकी दोन विजयांसह ६ गुणांची कमाई केली आहे.

krida
Asian Games : अवघ्या 9 बॉलमध्ये केली फिफ्टी! नेपाळच्या दिपेंद्र सिंगने मोडला युवराज सिंगचा रेकॉर्ड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com