Asian Games 2023 : दोन मुखर्जींनी रचला इतिहास; भारताला टेबल टेनिस महिला दुहेरीत मिळवून दिलं पहिलं पदक

Asian Games 2023
Asian Games 2023esakal

Asian Games 2023 : भारताच्या सुतिर्था आणि अयहिका मुखर्जीने भारताला टेबल टेनिस महिला दुहेरीमध्ये कांस्य पदक जिंकून केले. सुतिर्था आणि अयहिका यांनी एशियन गेम्समध्ये महिला दुहेरी टेबल टेनिसमध्ये पहिल्यांदाच भारताला पदक मिळवून देण्याचा इतिहास रचला.

एशियन गेम्समधील हे भारताचे नवव्या दिवसातील तिसरे कांस्य पदक आहे. यापूर्वी रोल स्केटिंगमध्ये भारतीय पुरूष आणि महिला संघाने कांस्य पदक जिंकले होते.

क्वार्टर फायनल सामन्यात यजमान चीनचा पराभव केल्यानंतर सेमी फायनल सामन्यात सुतिर्था आणि अयहिका यांना उत्तर कोरियाच्या खेळाडूंकडून पराभव सहन करावा लागला. उत्तर कोरियाच्या सुयाँग चा आणि युगयाँग पाक यांनी भारतीय जोडीचा सात गेमपर्यंत चाललेल्या सामन्यात पराभव केला.

Asian Games 2023
Rohit Sharma : वर्ल्डकप जिंकण्याची आशा... तिसरा वर्ल्डकप खेळणाऱ्या रोहितचं रेकॉर्ड आहे तरी कसं?

सेमी फायनल सामन्यात सुतिर्था आणि अयहिका यांनी उत्तर कोरियाच्या सुयाँग आणि सुगयाँग या जोडीविरूद्ध दमदार सुरूवत केली. त्यांनी पहिला गेम 11 - 7 असा जिंकला. मात्र दुसऱ्या गेममध्ये उत्तर कोरियाच्या जोडीने जोरदार पुनरागमन करत गेम 11 - 8 असा आपल्या नावावर केला.

तिसऱ्या गेममध्ये पुन्हा भारतीय जोडीने जोरदार खेळ करत गेम 11 - 7 असा खिशात टाकला. तीन गेमनंतर भारतीय संघ 2 - 1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर उत्तर कोरियाने सलग दोन गेम जिंकत भारताला 3 - 2 असे पिछाडीवर टाकले. यानंतर सहाव्या गेममध्ये भारताने पुन्हा मुसंडी मारत गेम 11 - 5 असा जिंकला.

Asian Games 2023
Asian Games 2023 : महिलांच्या अडथळा शर्यतीत फाऊलचा फिल्मी ड्रामा पण ज्योतीने रौप्य पटकावलंच...

मात्र सातव्या गेममध्ये उत्तर कोरियाच्या जोडीने 11 - 2 असा मोठा विजय मिळवत सामना 4 - 3 असा आपल्या नावावर केला. भारताच्या सुतिर्था आणि अयहिका यांचा जरी सेमी फायलनमध्ये पराभव झाला असला. त्यांची रौप्य पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले असले तरी त्यांनी भारताला एशियन गेम्समध्ये टेबल टेनिस दुहेरीमधील पहिलंवहिलं पदक पटकावून दिलं.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com