Rohit Sharma : वर्ल्डकप जिंकण्याची आशा... तिसरा वर्ल्डकप खेळणाऱ्या रोहितचं रेकॉर्ड आहे तरी कसं?

Rohit's record: जाणून घ्या कर्णधार रोहित चा नवीन रेकॉर्ड...
Rohit Sharma World Cup 2023
Rohit Sharma World Cup 2023esakal

Rohit Sharma World Cup 2023 : भारताचा कर्णधार रोहित शर्माकडून यंदाचा वनडे वर्ल्डकप जिंकण्याची अपेक्षा ठेवली जात आहे. भारतीय संघ तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्यात वर्ल्डकप हा मायदेशात होत असल्याने रोहित शर्माकडून जास्तच अपेक्षा ठेवण्यात येत आहेत.

2011 मध्ये वनडे वर्ल्डकप भारतात झाला होता. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 28 वर्षांनी वर्ल्डकपवर आपले नाव कोरले होते. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ एका तपानंतर (12 वर्षांनी) भारतात वर्ल्डकप खेळत आहे.

Rohit Sharma World Cup 2023
Asian Games 2023 : महिलांच्या अडथळा शर्यतीत फाऊलचा फिल्मी ड्रामा पण ज्योतीने रौप्य पटकावलंच...

भारतीय संघाने आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धची वनडे मालिका खिशात घालत आपली वर्ल्डकपची तयारी पूर्ण झाल्याचे संकेत दिले होते. भारतीय संघासोबतच कर्णधार रोहित शर्माने देखील दमदार कामगिरी केली होती. रोहित शर्माचा हा तिसरा वनडे वर्ल्डकप असून हा वर्ल्डकप त्याचा शेवटचा वर्ल्डकप देखील ठरण्याची दाट शक्यता आहे.

रोहित शर्माची 2015 च्या वर्ल्डकपमधील कामगिरी

रोहित शर्माची 2011 चा वर्ल्डकप खेळण्याची संधी हुकली होती. मात्र त्याचा 2015 च्या वर्ल्डकप संघात समावेश करण्यात आला होता. त्याने या वर्ल्डकपमध्ये 8 सामन्यात 47.14 च्या सरासरीने 330 धावा केल्या होत्या. यात एका शतकाचा आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. त्याने 91.66 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या.

2019 च्या वर्ल्डकपमध्ये रोहितचा धमाका

आपल्या पहिल्या वर्ल्डकपमध्ये समाधानकारक कामगिरी केल्यानंतर रोहितने दुसऱ्या 2019 च्या वर्ल्डकपमध्ये धमाकेदार कामगिरी केली. त्याने 9 सामन्यात तब्बल 81 च्या सरासरीने 648 धावा ठोकल्या. त्याने तब्बल 5 शतकी आणि एक अर्धशतकी खेळी केली होती. यात 140 धावांची सर्वात मोठ्या खेळीचा देखील समावेश आहे. त्याचे स्ट्राईक रेट 98.33 इतके होते.

Rohit Sharma World Cup 2023
World Cup 2023 : भारताच्या आदरातिथ्याने पाकिस्तानी संघाचा सपोर्ट स्टाफ चिंतेत... पत्रकार परिषदेत शादाब काय म्हणाला?

2023 मध्ये वनडेत रोहितची कामगिरी कशी?

2023 मध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 16 वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने 50.61 च्या सरासरीने 658 धावा केल्या. यात एका शतकी खेळीचा तर 6 अर्धशतकी खेळींचा समावेश आहे.

वनडेचा कर्णधार म्हणून रोहितचे बॅटिंग रेकॉर्ड

भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माने 34 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 55.76 च्या सरासरीने 1450 धावा केल्या असून नाबाद 208 धावा ही त्याची सर्वोकृष्ट खेळी ठरली. त्याने 105.53 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. कर्णधार म्हणून रोहितने 3 शतके तर 11 अर्धशतके ठोकली आहेत.

रोहितच्या नेतृत्वात भारताने 34 पैकी 24 सामन्यात विजय मिळवला असून 9 सामने गमावले आहेत तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com