Esha Singh silver medal Asian Games 2026
esakal
WHY DID ESHA SINGH WIN SILVER DESPITE 38 POINTS? भारताला आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सोमवारी नेमबाजीत २५ मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सांघिक गटात राही सरनोबतकडून झालेल्या एका चुकीमुळे भारताचे हातचे पदक निसटले होते. राही व ऑलिम्पिक विजेत्या मनू भाकेर यांना वैयक्तिक गटाच्या अंतिम फेरीत पात्रता मिळवता आली नाही. पण, २१ वर्षीय इशा सिंगने वैयक्ति गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि सुवर्णपदकासाठी जोर लावला. तिचे आणि चीनच्या Xiao Jiaruixian यांचे समसमान ३८ गुण झाले, परंतु चीनी खेळाडूला सुवर्णपदक दिले गेले.