Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Asian Games 2026 Day 10, Neeru Dhanda & Women's Relay Team India Gold : आशियाई क्रीडा २०२६ मध्ये भारताने मंगळवारी ५० पदकांचा टप्पा पार केला. नेमबाज नीरु धंडा आणि महिलांच्या रिले संघानेही सुवर्णपदक पटकावले. याशिलाय गुलवीरने पदकांची हॅट्रिक साधली.
Neeru Dhanda | Men's & Women's Relay Team India | Asian Games 2026

Neeru Dhanda | Men's & Women's Relay Team India | Asian Games 2026

Sakal

Updated on: 

India Wins 8 Medals in 29th September : आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेतील सोमवारचा दिवस भारतासाठी अत्यंत खास ठरला आहे. दिवसभरात भारताला ८ पदके मिळाली. नीरु धंडाने सुवर्ण वेध साधून दिवसाची सुरुवात दणक्यात केल्यानंतर भारताच्या महिला रिले संघाने सुवर्णपदकाला गवसणी घालत दिवसाचा शेवट गोड केला आहे. नीरुने सोमवारी दोन पदके जिंकली. याशिवाय रिलेमध्ये तीन पदके भारताला मिळाली.

Neeru Dhanda | Men's & Women's Relay Team India | Asian Games 2026
Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com