Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Neeru Dhanda Wins Asian Games 2026 Gold: जपानमधील आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत नीरु ढंडाने सुवर्णपदक जिंकले. हे भारताचे पाचवे सुवर्णपदक ठरले. काही तासांपूर्वीच तिने ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदकही मिळवले होते.
Neeru Dhanda Gold Medal At Asian Games 2026

Neeru Dhanda Gold Medal At Asian Games 2026

Sakal

Updated on: 

Neeru Dhanda Bags India's 5th Gold Medal in Asian Games 2026: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात पाचवे सुवर्णपदक आले आहे. नेमबाज नीरु ढंडा हिने सुवर्ण निशाणा साधत इतिहास घडवला आहे. तिने महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. हे तिचे स्पर्धेतील दुसरे पदक ठरले आहे.

२६ वर्षीय नीरु ही वैयक्तिक ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. विशेष म्हणजे हे सुवर्णपदक जिंकण्याच्या काही तास आधीच तिने महिला ट्रॅप सांघिक प्रकारात मनीषा कीर आणि आशिमा अहलावत यांच्यासोबत रौप्यपदक जिंकले होते. त्यांनी ३२८ पाँइंट्ससह पदक जिकंले होते. सांघिक प्रकारात चीनने (३४६ पाँइंट्स) सुवर्णपदक आणि कुवेतने (३२५ पाँइंट्स) कांस्य पदक जिंकले.

Neeru Dhanda Gold Medal At Asian Games 2026
Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com