esakal | आशियाई गोल्ड मेडलिस्ट डिंको सिंह यांचे निधन; मोदींनी वाहिली श्रद्धांजली
sakal

बोलून बातमी शोधा

आशियाई गोल्ड मेडलिस्ट डिंको सिंह यांचे निधन; मोदींनी वाहिली श्रद्धांजली

आशियाई गोल्ड मेडलिस्ट डिंको सिंह यांचे निधन; मोदींनी वाहिली श्रद्धांजली

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - बँकॉकमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱे माजी बॉक्सर डिंको सिंह यांचे निधन झाले. डिंको सिंह हे बराच काळापासून आजारी होते. 2017 मध्ये त्यांना लिव्हर कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. तेव्हापासून डिंको सिंह यांच्यावर उपचार सुरु होते.

41 वर्षीय डिंको सिंह यांना गेल्या वर्षी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर डिंको सिंह यांनी मात केली, पण कर्करोगाविरुद्धची झुंज मात्र अपयशी ठरली. 2020 मध्ये डिंको सिंह यांना दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलियरी सायन्सेसमध्ये रेडिएशन थेरपी देण्यात आली होती. यानंतर डिंको सिहं इम्फाळला परतले होते.

हेही वाचा: तहानलेल्या जिल्हाधिकाऱ्याला पाण्याऐवजी पाजलं चक्क अ‍ॅसिड

हेही वाचा: नवी अँटिबॉडी थेरपी, 12 तासात कोरोना रुग्ण झाले ठणठणीत

1998 मध्ये डिंको सिंह यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तसंच 2013 मध्ये पद्मश्री पुरस्कारही देण्यात आला होता. क्रीडा मंत्री किरन रिजिजू यांच्यासह अनेक नेत्यांनी डिंको सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही डिंको सिंहला श्रद्धांजली वाहिली आहे. बॉक्सिंग मधुन निवृत्ती घेतल्यानंतर डिंको सिंह नौदलात कार्यरत होते. त्यांनी प्रशिक्षणाचे कामही केले होते.