Asian Para Games 2026: भारतीय खेळाडूंचा ऍथलेटिक्समध्ये सुवर्ण व रौप्य पदकांचा 'डबल धमाका'! सौम्या, राधा अन् रिंकू-अजीतची कमाल

Asian Para Games Day 1 India Results: पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. सौम्या कुमार आणि राधा वेंकटेश या दोघींनी महिलांच्या १५०० मीटर टी१२/टी१३ प्रकारात, तर रिंकू, अजीत सिंग यांनी पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले.
Indian Athletes Shine at Asian Para Games

Indian Athletes Shine at Asian Para Games

Sakal

Updated on: 

पॅरा आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेला जपानमध्ये सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी (सोमवार, १९ ऑक्टोबर) भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. सौम्या कुमार आणि राधा वेंकटेश यांनी महिलांच्या १५०० मीटर टी१२/टी१३ प्रकारात आणि रिंकू व अजीत सिंग यांनी पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावण्याचा पराक्रम गाजवला. त्यामुळे पहिल्याच दिवशी ऍथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडू चमकताना दिसले.

Indian Athletes Shine at Asian Para Games
India Asian Games: भारताची तिरंदाजी, बॉक्सिंग, कुस्तीमध्ये झेप; नेमबाजी, ॲथलेटिक्समध्ये सर्वाधिक पदके; बॅडमिंटन, टेनिसमध्ये अपेक्षाभंग
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com