IND vs AUS Test Series : कांगारूंना अश्विन - अक्षरची धास्ती; सिडनीत उडवलाय नुसता 'धुरळा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS Test Series

IND vs AUS Test Series : कांगारूंना अश्विन - अक्षरची धास्ती; सिडनीत उडवलाय नुसता 'धुरळा'

IND vs AUS Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पहिला कसोटी सामना हा नागपूर येथे खेळवला जाणार आहे. भारतातील कसोटी मालिका म्हटलं की फिरकीपटूंचा बोलबाला असतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताचे फिरकीपटू आर. अश्विन आणि अक्षर पटेल यांची धास्ती घेतली आहे.

भारतीय फिरकीपटूंचा यशस्वी सामना करता यावा म्हणून ऑस्ट्रेलियाने एक शक्कल लढवली. संघाच्या सिडनी येथील छोट्याशा सराव सत्रावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतात जशा धुरळा उडणाऱ्या (फिरकीला साथ देणाऱ्या) खेळपट्ट्या असतात. त्या प्रकारची खेळपट्टी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तयार केली आहे. सिडनीत तसेही फिरकीला साथ देणारी खेळपट्टी असते.

याबाबत ऑस्ट्रेलियाचे कोच अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी इएसपीएल क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'कायरनने ग्राऊंड स्टाफ सोबत जबरदस्त काम केले, त्यांनी आम्हाला जशी हवी सथी खेळपट्टी करून दिली. भारतात आम्हाला ज्या प्रकारच्या खेळपट्ट्या मिळणार आहेत त्या सारखेची खेळपट्टी यांनी तयार करून दिली.

हुबेहूब तशीच खेळपट्टी तयार करणे अवघड काम असते. आम्हाला वाटते की त्यांनी जवळपास भारतातील खेळपट्टीसारखी खेळपट्टी करून दिली आहे. त्यामुळे ग्राऊंड स्टाफचे दर्जेदार काम केल्याबद्दल आभार'

भारतात 2021 मध्ये झालेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत अश्विन आणि अक्षर पटेल यांनी 59 विकेट्स घेतल्या होत्या. अश्विन आणि अक्षरच्या समोर उडालेली भंबेरी पाहून ऑस्ट्रेलिया संघ यंदा कोणतीही जोखीम घेणार नाहीये. म्हणूनच त्यांनी सिडनीत भारतात असलेल्या खेळपट्ट्यांसारख्या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे भारताने 2012 पासून मायदेशात कसोटी मालिका गमावलेली नाही.

(Sports Latest News)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल