IND vs NZ: टी-20 सामना मात्र षटकारा विना! भारत अन् न्यूझीलंडने तोडले सर्व रेकॉर्ड्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs nz

IND vs NZ: टी-20 सामना मात्र षटकारा विना! भारत अन् न्यूझीलंडने तोडले सर्व रेकॉर्ड्स

India vs New Zealand: लखनौमध्ये खेळला गेलेला भारत-न्यूझीलंड सामना क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय राहिला. या सामन्यात टीम इंडियाने एक चेंडू बाकी असताना 6 विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम खेळताना न्यूझीलंड संघाला केवळ 99 धावा करता आल्या. मात्र, टीम इंडियाला 100 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना खूप संघर्ष करावा लागला आणि अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने 20व्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

या टी-20 सामन्यात एकूण 39.5 षटके म्हणजेच 239 चेंडू खेळले गेले. न्यूझीलंडने पहिल्या 20 षटकात 8 गडी गमावून 99 धावा केल्या. यानंतर भारताने 19.5 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. मात्र 239 चेंडूंच्या खेळात एकही षटकार लागला नाही.

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 239 चेंडूपर्यंत एकही षटकार न मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात 2021 मध्ये मीरपूर येथे झालेल्या टी-20 सामन्यात 238 चेंडूंच्या खेळात एकही षटकार मारला नव्हता.

T20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वाधिक चेंडू ज्यात एकही षटकार लागला नाही

  • 239 चेंडू - भारत विरुद्ध न्यूझीलंड लखनौ 2023*

  • 238 चेंडू - बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड मिरपूर 2021

  • 223 चेंडू - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कार्डिफ 2010

  • 207 बॉल श्रीलंका विरुद्ध भारत कोलंबो 2021

दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 99 धावा केल्या. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने 2 तर दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी 1-1 विकेट घेतल्या. टीम इंडियाने 1 चेंडू शिल्लक असताना 100 धावांचे लक्ष्य गाठले. भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने नाबाद 26 आणि कर्णधार हार्दिक पंड्याने नाबाद 15 धावा केल्या.