ऑस्ट्रेलियन सरकारचा जोरदार बॅकहॅण्ड; जोकोविचचा व्हिसा पुन्हा रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Novak Djokovic

ऑस्ट्रेलियन सरकारचा जोरदार बॅकहॅण्ड; जोकोविचचा व्हिसा पुन्हा रद्द

Australia Open 2022 : ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी नोवाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियन सरकार यांच्यात रंगलेला सामना काही संपण्याचे नाव घेत नाही. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेसाठी रवाना झाल्यानंतर पासपोर्ट विभागाने जोकोविचला विमानतळावर अडवले. त्याचा व्हिसा ताब्यात घेतला. या सर्व प्रकरणात जोकोविचनं कोर्टात धाव घेतली तिथे तो जिंकलाही. आता पुन्हा Australian Immigration Minister च्या वतीने जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. आता जोकोविच यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Australian Immigration Minister cancels Novak Djokovics visa)

टेनिस जगतात अव्वलस्थानी असलेल्या जोकोविचचा (Novak Djokovics) व्हिसा रद्द करण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याने कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. त्यामुळे त्याला प्रवेश देणं धोकादायक असल्याचे स्पष्टीकरण देत ऑस्ट्रेलियन सरकारने (Australian Government) त्याला प्रवेश नाकारला आहे. सोमावारी न्यायालयाने जोकोविचच्या बाजूने निकाल देत त्याची इमिग्रेशन डीटेंशनमधून सुटका करण्यासह व्हिसा परत करण्याचा आदेश दिला होता.

हेही वाचा: RSA vs IND LIVE: कीगनचा काटा कोण काढणार?

या निकालानंतर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळण्याची आशा कायम असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली होती. पण ऑस्ट्रेलियन सरकारने कठोर पावले उचलत नियम म्हणजे नियम हा फॉर्म्युला वापरत जोकोविचचा व्हिसा पुन्हा रद्द केला. नोवाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियन सरकार यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. सरकारने दुसऱ्यांदा व्हिसा रद्द करत आपली ताकद दाखवून दिलीये. एवढेच नाही तर आगामी निवडणुकांना सामोरे जाताना कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये, याची दक्षताच सरकारने घेतलेली दिसते.

हेही वाचा: Ashes : साहेब 'देर आये पर दुरुस्त आए'

नोवाक जोकोविचसाठी हा मोठा धक्का आहे. व्हिसा रद्द झाल्यानंतर त्याच्यावर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळण्यासंदर्भातही तीन वर्षांच्या बंदीचा सामना करावा लागू शकतो. स्थानिक न्यायालयाने जोकोविचच्या बाजूनं निर्णय दिल्यानंतरही ऑस्ट्रेलियन इमिग्रेशन मंत्री एलेक्स हॉके यांनी न्यायालयीन निकालाला आव्हान देण्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते. आणि त्यांनी याबाबत फायनली निर्णयही घेतलाय.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top