Australian Open 2022 |ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कोरोना वाऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Australian Open 2022 Corona on the wind Tennis player not being tested seriously
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कोरोना वाऱ्यावर

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कोरोना वाऱ्यावर

मेलबर्न : नोवाक जोकोविचने कोरोना संबंधित नियम मोडल्यामुळे व लसीकरण पूर्ण न केल्यामुळे ऑस्ट्रेलियामधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला; पण आता याच ऑस्ट्रेलियातील मानाच्या ‘ग्रँड स्लॅम’ टेनिस स्पर्धेमध्ये कोरोना वाऱ्यावर सोडला जात असल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये चाचण्या गांभीर्याने होत नसल्याचा आरोप सहभागी टेनिसपटूंनी स्पर्धा संयोजकांवर केला आहे. (Corona update Australian Open 2022)

हेही वाचा: Australian Open:तारोने अँडी मरेची दुसऱ्याच फेरीत केली बॅग पॅक

फ्रान्सचा टेनिसपटू युगो हम्बर्ट याला रिचर्ड गासकेट यांच्याकडून सलामीच्या लढतीत हार सहन करावी लागली, पण ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेबाहेर पडत असताना करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत त्याला लागण झाल्याचे समजले. आता त्याला विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. जर्मनीचा दिग्गज टेनिसपटू ॲलेक्झांडर झ्वरेवनेही टीका करताना म्हटले की, ‘ऑस्ट्रेलियातील कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. तरीही टेनिसपटूंची दैनंदिन चाचणी घेण्यात येत नाही. काही खेळाडूंना आधिच कोरोनाचा संसर्ग झाला असण्याची भिती आहे.’

हेही वाचा: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची केंद्राला चिंता

मुगुरुझा, राडूकानू, मरे पराभूत

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये गुरुवारी तीन धक्कादायक निकालाची नोंद झाली. एलीजे कॉर्नेट हिने तिसऱ्या मानांकित गार्बीन मुगुरूझा हिला ६-३, ६-३ अशा फरकाने पराभूत केले व आगेकूच केली. डँका कोविनीचने अमेरिकन ओपन ‘ग्रँड स्लॅम’ची विजेती एम्मा राडूकानूचे कडवे आव्हान ६-४, ४-६, ६-३ अशा फरकाने परतवून लावले. पात्रता फेरीमधून आलेल्या जपानच्या टॅरो डॅनियलने अव्वल अँडी मरे याच्यावर ६-४, ६-४, ६-४ अशा फरकाने विजय मिळवला.

या प्रमुख खेळाडूंनी मिळवले विजय

  • महिला एकेरी : आर्यना सबालेंका, सिमोना हालेप, इगा स्वीयतेक

  • पुरुष एकेरी : डॅनील मेदवेदेव, स्टेफिनोस त्सित्सिपास, आंद्रे रुब्लेव

Web Title: Australian Open 2022 Corona On The Wind Tennis Player Not Being Tested Seriously

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top