Babar Azam : 'पाकिस्तानी' फिजिक्सच्या पुस्तकात बाबरचा 'कव्हर ड्राईव्ह'

Babar Azam Cover Drive Include In Pakistan 9th Standard Physics Book
Babar Azam Cover Drive Include In Pakistan 9th Standard Physics Bookesakal

Babar Azam Cover Drive : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या तीनही क्रिकेट फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून गणला जातो. नुकच्याच झालेल्या आशिया कपमध्ये त्याची बॅट तशी शांतच होती. मात्र असे असले तरी पाकिस्तानमधील इयत्ता 9 वी फिजिक्सच्या पुस्तकात (Physics Book) बाबर आझमच्या एका खास शॉटचा उल्लेख करण्यात आला आहे.

Babar Azam Cover Drive Include In Pakistan 9th Standard Physics Book
Robin Uthappa : सीएसकेच्या रॉबिन उथप्पाने घेतली निवृत्ती

बाबर आझमचा कव्हर ड्राईव्ह हा फेव्हरेट शॉट आहे. बाबर आझमच्या या फेव्हरेट शॉटला आता शाळेच्या पुस्तकात देखील स्थान मिळाले आहे. फिजिक्सच्या पुस्तकात या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आला आहे. पुस्तकातील या प्रश्नाचा फोटो पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार शिराज हसन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

Babar Azam Cover Drive Include In Pakistan 9th Standard Physics Book
Sachin Tendulkar : सचिनचा बॅटची ग्रिप स्वच्छ करतानाचा VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

बाबर आझमने आतापर्यंत 42 कसोटी सामन्यात 75 डावांमध्ये 3 हजार 122 धावा केल्या आहेत. त्याची कसोटीमधील सर्वोच्च धावसंख्या ही 196 आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने 92 सामन्यात 90 इनिंग खेळत 4 हजार 664 धावा केल्या आहेत. त्याची 158 धावा ही वनडेतील सर्वोच्च खेळी आहे. टी 20 मध्ये बाबर आझमने 75 डावात 2 हजार 754 धावा केल्या असून त्याने एक शतक (122) देखील ठोकले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com