India Open 2022 : 36 मिनिटांत खेळ खल्लास; सिंधूनं गाठली सेमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pv sindhu enters semifinals of india open badminton tournament

India Open 2022 : 36 मिनिटांत खेळ खल्लास; सिंधूनं गाठली सेमी

भारताची स्टार शटलर आणि सलग दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूनं India Open 2022 स्पर्धेची सेमी फायनल गाठली आहे. महिला एकेरी गटात सिंधूनं (PV Sindhu ) भारतीय अश्मिता चलिहा हिला 21-7, 21-18 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. अवघ्या 36 मिनिटात तिने क्वार्टर फायनल गेम संपवली. (India Open 2022 PV Sindhu Enters Semifinals Of India Open Badminton Tournament)

सिंधूने 21 वर्षीय अश्मिताचा निभावच लागू दिला नाही. आता सेमी फायनलमध्ये तिची लढत थायलँडच्या सहाव्या मानांकित सुपानिदा कातेथोंग हिच्याविरुद्ध रंगणार आहे. कातेथोंग हिला क्वार्टर फायनलमध्ये वॉकओवर मिळाला होता. तिसऱ्या क्रमांकाची मानांकित सिंगापुरची यीयो जिया मिन हिने तापानं फणफणत असल्यामुळे स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यामुळे कोतेथोंग थेट सेमी फायनल खेळताना दिसेल.

सिंधू आणि अश्मिता यांच्यात याआधी 2019 मध्ये 83 व्या सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते. आसामच्या अश्मिताने त्यावेळी जबदस्त कामगिरी करुन दाखवली होती. इंडिया ओपनच्या क्वार्टर फायनलमध्येही दुसऱ्या सेटमध्ये तिने सिंधूला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण सिंधूनं बाजी मारली.

हेही वाचा: SA vs IND : टीका झाली माप, तरीही विराट भाऊची कॉलर ताठ

सलामीलाच सिंधूनं 11-5 अशी आघाडी घेतली होती. आक्रमक खेळीनं अश्मिताला तिने बॅकफूटवर ढकलले. दुसऱ्या सेटमध्ये अश्मिताने 9-9 गुणांपर्यंत बरोबरी केली. त्यानंतर सिंधूनं 15-11 अशी आघाडी घेतली. त्यानंतर अश्मिताने पुन्हा सलग चार पॉइंट्स घेत सेट 15-15 असा बरोबरीत आणला. त्यानंतर सिंधू विजयी पॉइंट्स घेऊनच थांबली.

हेही वाचा: IPL 2022 : मेगा लिलावापूर्वी KKR चा आणखी एक मोठा डाव

महिला एकेरीतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आकर्षी कश्यपची लढत थायलँडच्या बुसानन ओंग्बारुंगफान हिच्या विरुद्ध रंगणार आहे. क्वार्टर फायनलमध्ये आकर्षीनं सायना नेहवालला पराभूत करुन स्पर्धेत उलटफेर करण्याची ताकद असल्याचे दाखवून दिलेल्या मालविका बनसोवडेला 21-12, 21-15 असे पराभूत केले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top