IPL 2022 : मेगा लिलावापूर्वी KKR चा आणखी एक मोठा डाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 Bharat Arun joins Kolkata Knight Riders

IPL 2022 : मेगा लिलावापूर्वी KKR चा आणखी एक मोठा डाव

IPL 2022 : आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) भारतीय क्रिकेट संघाचे माजी बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) यांना आपल्या ताफ्यात घेतलं आहे. आता ते कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावताना दिसतील. भरत अरुण यांनी 4 वर्षे भारतीय क्रिकेट संघासोबत काम केले आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतरच त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. आता ते कोलकाताच्या गोलंदाजांना मार्गदर्शन करताना दिसतील. (IPL 2022 Bharat Arun joins Kolkata Knight Riders as bowling coach)

कोलकाता नाईट रायडर्सचे (Kolkata Knight Riders) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकी मैसूर यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिलीये. ते म्हणाले की, "आम्ही भरत अरुण (Bharat Arun) यांच्याकडे संघाच्या गोलंजीची संपूर्ण जबाबदारी देत आहोत. त्यांच्या नियुक्तीचा आम्हाला आनंद आहे. ते अनुभवी असून अन्य स्पेशलिस्ट टीमसह ते संघासोबत काम करतील."

हेही वाचा: SA vs IND : टीका झाली माप, तरीही विराट भाऊची कॉलर ताठ

भारतीय संघाचे मुख्य कोच असलेल्या रवि शास्त्री यांच्या स्टाफ सदस्यांपैकी भरत अरुण एक होते. त्यांनी भारतीय संघाच्या गोलंदाजी विभागात काम पाहिले होते. त्यांनी स्वत: टीम इंडियाकडून दो कसोटीसह चार एकदिवसीय सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून त्यांनी मैदान गाजवले आहे. अरुण यांनीही नव्या फ्रेंचायझींसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: WTC 23 Points Table : टीम इंडियाला फटका, आफ्रिकेची झेप!

कोलकाता नाईट रायडर्सने यापूर्वी ब्रँडम मॅक्युलम यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. मॅक्युलम यांनीही अरुण यांचे स्वागत केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी छाप उमटवली आहे. त्याचा संघाला निश्चितच फायदा होईल, असेही बँडम मॅक्युलम म्हणाले आहेत. आयपीएल मेगा लिलावापूर्वी कोलकाता संघाने दोन परदेशी आणि दोन भारतीय खेळाडूंना रिटेन केले होते. परदेशी खेळाडूंमध्ये सुनील नरेन, आणि आंद्रे रसेल यांचा समावेश होता. वरुण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर यांच्यावर कोलकाताने भरवसा दाखवला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top