SA vs IND : टीका झाली माप, तरीही विराट भाऊची कॉलर ताठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akash Chopra Slam Virat Kohli

SA vs IND : टीका झाली माप, तरीही विराट भाऊची कॉलर ताठ

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील टीम इंडियाचा (Team India) दक्षिण आफ्रिकेनं चौथ्या दिवशीच खेळ खल्लास केला. केपटाऊन कसोटीतील पराभवासह भारतीय संघाची आफ्रिकेत (South Africa) पताका फडकवण्याची सुवर्ण संधी हुकली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता. मात्र पिछाडी भरुन काढत आफ्रिकेनं आपला किल्ला आजही मजबूत असल्याचे दाखवून दिले. या पराभवानंतर विराटच्या कोहलीने बॅटिंगमधील अपयश महागात पडल्याची कबुली दिली.

DRS वरुन रंगलेल्या वादावर काय म्हणाला विराट

यावेळी विराट कोहलीने डीआरएसच्या मुद्यावरुन स्टंम्प माइकवरुन बोलण्याच्या गोष्टीवरही थोडक्यात भाष्य केले. या वादावर मला काही बोलायच नाही असं तो पहिल्यांदा म्हणाला. त्यानंतर मैदानावर जे काही घडलं ते बाहेरील लोकांना माहित नसते. मी जे काही वागलो त्याला काहीतरी संदर्भ होता. तो निर्णय जर आमच्या बाजूनं लागला असता तर सामन्याला कलाटणी मिळाली असती, असेही तो बोलून गेला. या वक्तव्यासह त्याने जे घडलं त्याला कारण होतं आणि मी बरोबरच वागलो, असाच काहीसा त्याचा रोख होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले गेले होते. पण जोहन्सबर्ग आणि केपटाऊनच्या खेळपट्टीवर (Cape Town Test) भारतीय फलंदाजीतील हवाच निघाली. सामन्यातील पराभवानंतर मॅच प्रेझेंटेशनमध्ये विराट कोहलीने टीम इंडियाच्या पराभवामागचे कारण स्पष्टपणे कबुल केले. कोहली म्हणाला की, ही मालिका संघर्षमय झाली. दोन्ही संघात चुरस पाहायला मिळाली. आम्ही पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली.

हेही वाचा: WTC 23 Points Table : टीम इंडियाला फटका, आफ्रिकेची झेप!

पण उर्वरित दोन सामन्यात फलंदाजीत आम्ही कमी पडलो. चांगल्या खेळाच्या जोरावर आफ्रिकेनं कमबॅक करत मालिका जिंकली. फलंदाजीत खराब कामगिरी हेच भारतीय संघाच्या पराभवाचे कारण ठरले, असेही तो म्हणाला. फलंदाजांनी धावा केल्या नाहीत. आफ्रिकन गोलंदाजांनी परिस्थितीचा फायदा उठवला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंजांनी उंचीचा पूरपूर फायदा घेत खेळपट्टीचा योग्य उपयोग करुन मारा केला. आणि भारतीय फलंदाजांना अडचणीत आले, असेही विराट कोहलीने म्हटले आहे.

हेही वाचा: SA vs IND, 3rd Test: 30 वर्षे, 7 कर्णधार... पण पुन्हा आफ्रिकेत मात

आम्ही फलंदाजीत कमी पडलो ही गोष्ट मान्य करावीच लागेल. सातत्याने फलंदाजीतून धावा न होणे ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे हा पराभवानंतर आम्ही निराश आहोत. आम्ही दक्षिण आफ्रिकेला दबावात आणले. पण त्यात सातत्य राखू शकलो नाही. यावेळी विराट कोहलीने वनडे मालिकेसाठी पुन्हा एकदा जोमाने मैदानात उतरु. आणि कसोटटी मालिकेतील पराभव विसरुन आता वनडेवर लक्ष्य केंद्रीत करु, असेही त्याने सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top