अजून जिद्द गमावलेली नाही!

अजून जिद्द गमावलेली नाही!

पुणे - देशसेवा करताना समोर आलेले प्रत्येक आव्हान आणि संकटांशी दोन हात करून जवान आपले जीवन जगत असतात. अशाच एखाद्या युद्धात कुणाला हात, तर कुणाला पाय गमवावे लागतात; पण हे दुःख पचवून ते जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांनी जिद्द गमावलेली नसते, उलट नव्याने काही तरी करून दाखविण्यासाठी ते सज्ज असतात याचा प्रत्यय आज येथे झालेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये पुणेकर नागरिकांना आला. या स्पर्धेत दिव्यांग जवानांनी सहभागी होत जगण्याचे एक रहस्यच उलगडले. 

देशाची सेवा करताना आलेल्या शारीरिक व्यंगांना कवटाळून न बसता त्यालाच ताकद बनवून अफाट इच्छाशक्तीच्या बळावर ते इतरांना जगण्याची प्रेरणा देतात. व्हीलचेअर असली म्हणून काय झाले आणि त्या आधारे ही धावू शकतो, हे या जवांनानी आजच्या स्पर्धेतून दाखवून दिले. या सर्वांचा स्पर्धेत केवळ सहभाग नव्हता, तर उत्साहदेखील दांडगा होता. जवानांचा उत्साह पाहून पुणेकर हरखून गेले. ‘फॅमिली रन’पूर्वी झालेली दिव्यांग जवानांची व्हीलचेअर शर्यत स्पर्धेचे वेगळे आकर्षण ठरली. शर्यत सुरू होताच जवान पुढे सरकत होते, तस तसे अनेकांनी त्यांच्या उत्साहाला आणि जीवनाकडे पाहण्याच्या सकारात्मकतेला सलाम केला. 

दिव्यांग असलो म्हणून काय झाले, आपणही खेळू किंवा धावू शकतो, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले होते. या शर्यतीत खडकीच्या पॅराप्लेजिक सेंटरकडून के. ए. रेड्डी, रमेश गाढवे, धर्मवीर सिंग, हेमंतदास, रामदास मोरे, तांगसिंग, मिनबहादूर थापा, गोविंद बिराजदार, निर्मलकुमार छत्री, आनंद प्रसाद हे सहभागी झाले होते. या सर्वांनी नागरिकांना खेळत राहा आणि तंदुरुस्ती जपा, असा संदेशही दिला. 

ही मॅरेथॉन आमच्यासाठी पर्वणी असते. या स्पर्धेसाठी आम्ही विशेष तयारी करतो. गतवर्षी याच स्पर्धेत तिसरा आलो होतो. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही आपण जिंकू शकतो, हे आज मी अनुभवले. 
- रामदास मोरे (दिव्यांग स्पर्धक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com